‘न्यू इयर धमाका एक्‍स्पो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘न्यू इयर धमाका एक्‍स्पो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे - नव्या वर्षाची मनसोक्त खरेदी करण्याची अनोखी संधी देणाऱ्या ‘सकाळ-मधुरांगण’च्या ‘न्यू इयर धमाका एक्‍स्पो’ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजाराभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असणारी दर्जेदार उत्पादने व उपयुक्त माहिती देणारे प्रदर्शन विविध क्षेत्रांतील नव्या उत्पादनांबरोबर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, हजारो रुपयांची पारितोषिके जिंकण्याची संधीही या एक्‍स्पोने आणली आहे.

म्हात्रे पूल परिसरातील घरकुल लॉन्स येथे रविवार (ता. २१) पर्यंत दु. १२ ते सायं. ८ या वेळेत हा एक्‍स्पो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. खास आकर्षण म्हणून लकी ड्रॉ विजेती/विजेत्याला रु. ३५,००० किमतीची पैठणी मिळणार आहे. एक्‍स्पोचे स्थळ प्रायोजक हॉटेल श्रेयस व घरकुल लॉन्स, बक्षीस व लकी ड्रॉ प्रायोजक रिअल ग्रुप व सौदामिनी हॅंडलूम आहेत. सौदामिनी हॅंडलूमतर्फे ‘मधुरांगण’ सभासदांना २८ फेब्रुवारीपर्यंत पैठणीवर १५ टक्के सवलतही मिळणार आहे व रिअल ग्रुपतर्फे रु. २३,५०० चे घरच्याघरी तेल काढण्याचे मशिनही देण्यात येणार आहे. 

शनिवारी (ता. २०) दुपारी २ वाजता पाककलातज्ज्ञ अंजली पुराणिक यांच्या ‘सूप टू डेझर्ट’मध्ये २५ प्रकारच्या रेसिपी शोमध्ये सुप्स - व्हेजिटेबल (मिक्‍स व्हेज), मिनीस्टोन, क्‍लिअर (हॉट अँड सोअर), सॅलड्‌स - कलरफूल, फ्रूट व्हेज रायता, स्नॅक्‍स - कोल्हापुरी मिसळ, मुगाची कचोरी, पराठे - कांदा चीज, कोबी पनीर, मूग, लच्छा, चायनीज-चिली पनीर, व्हेज मंच्युरियन, व्हेज शेजवान राईस, शेजवान चटणी, स्वीट कॉर्न सूप, भाज्यांचे प्रकार-रसगुल्ला माखनवाला, नवरत्न कुर्मा, फिरनी, पुलाव-पंजाबी दम बिर्याणी, तवा पुलाव, केक - ऑरेंज मफिन्स, डेट वॉलनट केक, पायनापल पेस्ट्री, पुडींग्ज - ड्रीमी चॉकलेट, ट्रायफल या पदार्थांचा समावेश आहे. ‘मधुरांगण’ सभासदांना रु. ६५०, तर सदस्य नसलेल्यांसाठी रेसिपीच्या प्रिंटसह शुल्क रु. १२५० आहे.  

रविवारी (ता. २१) दुपारी १ वाजता प्रथम क्रमांकासाठी रु. २५ हजार पारितोषिक असणारी ‘पैठणी क्वीन’ स्पर्धा होत आहे. ‘मधुरांगण’ सभासदांसाठी स्पर्धा विनामूल्य आहे. सदस्येतर महिलांसाठी रु. १५०० शुल्क आहे. सायं. ५ वाजता ‘उदरस्थ’ पुस्तकाच्या लेखिका वैद्य रूपाली पानसे यांच्यासोबत ‘आरजे’ स्मिता ‘सकाळ मधुरांगण’ व ‘रसिक साहित्य’ यांच्या ‘नैवेद्य ते चिअर्स!’ या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. 

‘मधुरांगण’ सभासद नोंदणी कार्यक्रमस्थळी दु. १२ ते रात्री ८ पर्यंत करता येईल. 

अधिक माहितीसाठी संपर्क - ९०७५०१११४२ किंवा ८३७८९९४०७६.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com