आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले पहिले अभिनेते 

आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले पहिले अभिनेते 

पुणे - भारतीय चित्रपटाला अभिनयासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा नेण्याचा मान अभिनेते शशी कपूर यांना जातो."मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शन'च्या "द हाऊसहोल्डर', "शेक्‍सपिअरवाला', "हिड ऍन्ड डस्ट' अशा गाजलेल्या अमेरीकन व ब्रिटिश चित्रपट कपूर यांनी आपल्या सकस अभिनयाने समृद्ध केले. कपूर यांनी अभिनय केलेल्या याच "मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शन'च्या चित्रपटांचे जतन करून कपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम पुण्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) करत आहे. 

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी, नसरुद्दीन शहरापासून ते अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन अशा नामवंत कलाकारांचा "हॉलीवूड' प्रवास आपण काही वर्षांपासून अनुभवत आहोत. मात्र साठ-सत्तरच्या दशकामध्ये हॉलिवूड किंवा ब्रिटिश चित्रपटामध्ये पहिल्यांदा शशी कपूर यांनी पहिल्यांदा अभिनय केला. "मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शन' निर्मिती व जेम्स आयव्हरी दिग्दर्शित "द हाउस होल्डर' (1963) या इंग्रजी व हिंदी भाषेतील चित्रपटात काम केले. त्यानंतर याच निर्मिती कंपनीच्या शेक्‍सपिअरवाला (1965), बॉम्बे टॉकी (1970) या चित्रपटांमध्ये काम केले. याबरोबरच इस्माईल मर्चंट यांच्या "इन कस्टडी (1983) या चित्रपटांसह त्यांनी "सिद्धार्था' (1972), सॅमी ऍन्ड रुजी गेट लेड (1987), मुहाफीज (1994) अशा चित्रपटांमध्येही काम केले. याच दरम्यान ब्रिटिश अभिनेत्री जेनीफर केंडेल यांच्याबरोबर त्यांनी "द डिसेव्हर्स', "साइड स्ट्रीट' चित्रपटांमध्ये काम केले. पुढे जेनिफरबरोबरच ते विवाहबंधनात अडकले. 

कपूर यांच्या याच इंग्रजी चित्रपटांचा संग्रह "एनएफएआय'ने जतन केला आहे. याबाबत "एनएफएआय'चे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ""मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शन'च्या चित्रपटांमध्ये कपूर यांनी अभिनय केला. भारतीय अभिनयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा नेण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी अभिनय केलेल्या अनेक इंग्रजी चित्रपटांचा संग्रह आपण जतन केला आहे. 

दुर्मिळ पोस्टर, छायाचित्रांचा ठेवा 
शशी कपूर यांनी अभिनय केलेल्या, निर्मिती केलेल्या असंख्य चित्रपटांचे दुर्मिळ पोस्टर, छायाचित्रे "एनएफएआय'कडे आहेत. "त्रिशुल', "फूल खिले है गुलशन', "धर्मपुत्र', "प्रेमपत्र', "दीवार' या चित्रपटांसह त्यांची निर्मिती असलेल्या "उत्सव', "विजेता' अशा चित्रपटांमधील दुर्मिळ पोस्टर, छायाचित्रांचा ठेवा "एनएफएआय'ने जतन केला असल्याचे मगदूम यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com