खोले यांच्यामुळे माझी बदनामी - निर्मला यादव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कात्रज - ""डॉ. मेधा खोले यांच्या कृत्यामुळे माझी बदनामी झाली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार  नाही,'' असा निर्धार निर्मला यादव यांनी निषेध सभेत व्यक्त केला. 

दक्षिण पुणे आधारवड ज्येष्ठ नागरिक संघ आणि सकल बहुजन समाज परिवार यांनी "सोवळे' प्रकरणाबाबत या सभेचे आयोजन केले होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव उपस्थित होते. 

यादव म्हणाल्या, ""माझा केटरिंगचा व्यवसाय आहे. खोले यांच्याकडे केवळ सणाच्या काळात स्वयंपाक करण्याचे काम एका मध्यस्थाने मला दिले होते. तीन वेळा स्वयंपाक केल्यानंतर चौथ्यांदा स्वयंपाक करण्यापूर्वी मी कामाचे पैसे मागितले होते. त्याचा त्यांना राग आला असावा.'' मी मराठा आहे, हे समजल्यानंतर खोले यांनी माझ्या घरी येऊन मला मारहाण केली आणि खोटी तक्रार दाखल केल्याचे यादव यांनी सांगितले. 

बाबा आढाव म्हणाले, ""हवामानशास्त्रज्ञ असणाऱ्या खोले या विज्ञानवादी नाहीत, हे दुर्दैव आहे. मानवी रक्तात मानवी जात-धर्म कुठेही सापडत नाही. तरीही काही जण आजही ब्राह्मण्याला चिकटून बसले आहेत. गौरी लंकेश यांना गोळीने संपवलं. खोले यांनी यादव यांना गोळीपेक्षाही मोठी जखम केली आहे. या  विरोधात संघर्ष केलाच पाहिजे.'' या वेळी शीला आढाव, जिजाऊ ब्रिगेडच्या उषा पाटील, उमेश शिंदे, तुषार काकडे उपस्थित होते. प्रास्ताविक मुकुंद काकडे यांनी केले. नाना निवंगुणे यांनी आभार मानले.

Web Title: pune news Nirmala Yadav Dr. Medha khole