आधार नसल्याने गॅस सिलिंडर नाही !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

पुणे - हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या गॅस सिलिंडर वितरक कंपन्यांनी प्रत्येक गॅसधारकांना ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) अंतर्गत आधारजोडणी बंधनकारक केले आहे. ज्यांची आधारजोडणी नाही, त्यांना गॅस सिलिंडर न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे; परंतु नवीन गॅसजोड घेणाऱ्या ग्राहकांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांना गॅस दिला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. 

सध्या शहर आणि जिल्ह्यातील आधार नोंदणी सुविधा बंद आहे. महा ई-सेवा केंद्रे, सेतू केंद्रांवर आधारनोंदणी तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. तसेच महापालिकेच्या हद्दीतील क्षेत्रीय कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रदेखील बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेशनचे धान्य, रॉकेल, साखर यासोबत गॅस सिलिंडर मिळत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

या संदर्भात ‘भारत पेट्रोलियम’चे प्रादेशिक अधिकारी पवन कुमार म्हणाले, ‘‘केंद्रीय पेट्रोलियम खात्याच्या सूचनेनुसार प्रत्येक गॅसजोड ग्राहकांचे ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) अंतर्गत आधारजोडणीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरितमध्ये ज्यांनी नवीन जोड घेतले आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड काढल्याची पावती घेऊन ते दिले जात आहे; परंतु ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीच त्यांना जोड न देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे. ज्यांची आधार कार्ड नोंदणी नाही, अशा काही हजारांमध्ये असलेल्या ग्राहकांची ही समस्या असू शकते. आमची सेवा सुरळीत सुरू आहे.’’

नागरिकांकडून तक्रारी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधार कार्ड सक्तीचे नसले तरी विविध नागरी योजनांमध्ये आधार कार्ड हा पुरावा ग्राह्य धरला जात आहे. रेशन, गॅस, रॉकेल, बॅंक सुविधा, वाहन चालविण्याचा पुरावा, मोबाईल, शासकीय योजना सर्व ठिकाणी आधार कार्ड हा ठोस पुरावा ग्राह्य धरला जात आहे; परंतु तांत्रिक समस्येमुळे आधार नोंदणी करणारी केंद्र बंद ठेवल्यामुळे नवीन आधार कार्ड काढून दिले जात नाहीत. परिणामी, आधार कार्ड नसल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये अत्यावश्‍यक असलेला सिलिंडर घेता येत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.

Web Title: pune news no gas cylinder by aadhar card