कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत भांडारकर संस्थेला नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या आरक्षणविषयक धोरणांची अंमलबजावणी न करणे, कर्मचाऱ्यांना शासनमान्य वेतनश्रेणीनुसार पगार न देणे, या मुद्द्यांवरून उच्च शिक्षण संचालनालयाने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेस नोटीस बजावली आहे. 

शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हितकारिणी संघटनेने याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार डॉ. माने यांनी ही नोटीस बजावली असून, विविध मुद्द्यांचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने ज्या कारणांसाठी अनुदान दिले, ते त्याच कामासाठी खर्च न करता ती रक्कम बॅंकेत ठेवून त्यावर व्याज प्राप्त केल्याचा ठपकाही माने यांनी ठेवला आहे. 

संस्थेचे विश्‍वस्त राहुल सोलापूरकर म्हणाले, ""आमची संस्था खासगी आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम आम्हाला लागू होत नाहीत. संस्था खासगी असल्याने कर्मचाऱ्यांची वेगळी नोंदणीकृत संघटना आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे विषय हाताळले जातात. हे प्रकरण कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे. मात्र, धनराज माने यांचा त्याच्याशी संबंध येत नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रकरणासाठी न्यायालयात जाऊन उत्तर देऊ.''

Web Title: pune news notice Bhandarkar institute