पुण्याला जुनीच लोकल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या ताफ्यात नवीन लोकल (रेक) दाखल होण्याची अपेक्षा असताना मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वेला जुनीच लोकल उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेकडून पुण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचे दिसत असले, तरी रेल्वे प्रशासन मात्र त्यावर गप्प का, अशा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

पुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या ताफ्यात नवीन लोकल (रेक) दाखल होण्याची अपेक्षा असताना मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वेला जुनीच लोकल उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेकडून पुण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचे दिसत असले, तरी रेल्वे प्रशासन मात्र त्यावर गप्प का, अशा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

रेल्वेच्या ताफ्यात सध्या चार लोकलचा समावेश आहे; परंतु त्या लोकलला चाळीस वर्षे झाली आहेत. त्याचा आता लोकलसेवेवर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-लोणावळा लोकल प्रवासाला नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. सध्याच्या लोकलचा वेग हा ताशी ८० कि.मी. आहे. त्यामुळे पुणे रेल्वेसाठी नवीन व वेगाने 

धावू शकणाऱ्या लोकल उपलब्ध करून देण्याची मागणीही प्रवाशांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे नवीन रेकची मागणी केली होती. त्यानंतर ११० कि.मी. वेगाने धावू शकणारे रेक पुणे विभागाला उपलब्ध होण्याची चर्चा सुरू होती. एक वर्षापूर्वी पुणे विभागाला नवीन लोकल उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून नवीन लोकलची केवळ चर्चा आहे. असे असतानाच दोन दिवसांपूर्वी पुणे मंडलला मध्ये रेल्वेकडून जुनी पंधरा डबांची लोकल उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा प्रवाशांचा अवमान असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.

नवे मुंबईला अन्‌ जुने पुण्याला...
मध्य रेल्वेला नवीन २४ लोकल दाखल झाल्या आहेत. त्या ताशी १०० कि.मी.ने धावू शकतात. प्रवाशांना सूचना देण्यासाठी प्रत्येक रेकमध्ये यंत्रणा, प्रवासीक्षमता १० टक्‍क्‍यांनी जास्त, हवा खेळती राहण्यासाठी लोकलच्या डब्यांमध्ये एअर हॅंडलिंग युनिटचा समावेश, धावत्या लोकलला ब्रेक लावल्यानंतर वीज पुनर्निर्मितीची क्षमता, ही या लोकलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी पुण्यातला काही मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र या गाड्या मुंबईमध्ये वापरून जुनी झालेली लोकलमध्ये विभागाने पुण्याकडे पाठवून दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जुनीच लोकल दाखल झाल्याने रेल्वे प्रशासनाने ती नाकारून नवीन लोकलसाठी आग्रह धरला धरणे अपेक्षित आहे. मात्र रेल्वे प्रशासन त्यावरच खूष असल्याचे बोलले जात आहे.

मध्य रेल्वेकडून पुणे विभागाला जी दुय्यम वागणूक दिली जात आहे. ती योग्य नाही. शहरात आठ आमदार आणि दोन खासदार आहेत. पुणेकरांनी त्यांना भरभरून मते दिली आहेत. असे असताना मध्ये रेल्वेकडून, अशी पुणे शहराला अशी वागणूक कशी दिली जाऊ शकते. पुणे-लोणावळादरम्यान रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा त्या प्रवाशांचा अवमान आहे,.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

Web Title: pune news old local for pune