ज्येष्ठ, आजारी, दिव्यांगांना ‘आधार’

ज्येष्ठ, आजारी, दिव्यांगांना ‘आधार’

पुणे - शहरातील ज्येष्ठ, आजारी आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना आधार केंद्रावर येणे शक्‍य होत नसल्याने आधार कार्ड काढण्यासाठी त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘कॉल ऑन आधार’ही सशुल्क सेवा सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रथम लेखी अर्ज करावा लागेल. त्यानंतर अर्जांची छाननी आणि संबंधितांची शहानिशा केल्यानंतर आधार केंद्राकडून संपर्क साधला जातो. त्यानुसार अर्जदाराच्या घरी जाऊन आधार’ नोंदणी करून कार्ड काढून दिले जाईल, असे राव यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये १८५ आधार कार्ड केंद्रे सुरू आहेत. ही सेवा मोफत देण्यात येत आहे. केंद्रांची संख्या आणि उपलब्ध मशिनची संख्या कमी असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या अडचणी विचारात घेऊन सशुल्क आधार सेवा सुरू केली आहे. यामुळे ज्येष्ठ, शारीरिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असेही राव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘आधार’ केंद्रांचे प्रकल्प अधिकारी मनोज जाधव म्हणाले, ‘‘संबंधितांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर संपर्क साधून त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन आधार कार्ड काढून दिले जाईल. यात प्रत्येक कार्डसाठी चारशे रुपये प्रमाणे शुल्क आकारले जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर कायमस्वरूपी आधार केंद्र सुरू केले असून, त्या केंद्रामध्ये ही सुविधा सुरू आहे.’’

आधारसाठीची दरनिश्‍चिती...
शहर आणि जिल्ह्यातील नवीन आधार नोंदणीकरण, पाच आणि पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलांचे बायोमेट्रिक अद्ययावत करणे ही सेवा मोफत

प्रत्येक कार्डसाठी चारशे रुपयेप्रमाणे शुल्क आकारले जाईल.

इतर बायोमेट्रिक अद्ययावत करणे आणि नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल आदी माहिती दुरुस्तीसाठी २५ रुपये शुल्क

आधार क्रमांक शोधणे व त्याची ए ४ साइज ‘ब्लॅक ॲँड व्हाइट’ एक प्रत देण्यासाठी दहा रुपये, तर रंगीत प्रत देण्यासाठी २० रुपये शुल्क

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com