पुणे-सातारा रस्त्यावर खासगी बसला अपघात; एकाचा मृत्यू

महेंद्र शिंदे
रविवार, 18 मार्च 2018

या अपघातानंतर काही वेळ पुणे-सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र महामार्ग पोलिस आणि महामार्ग पेट्रोलिंग पथकाने क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.फौजदार मोहन तलबार पुढील तपास करत आहेत.

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर वरवे (ता. भोर) येथे रविवारी पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी प्रवासी बस रस्त्यावर उलटली. या अपघातात ज्ञानेश्वर महादेव थोरात (वय 29, रा. माळशिरस) यांचा मृत्यु झाला; तर अकरा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक खासगी प्रवासी बस मुंबईहुन साताऱ्याकडे निघाली होती. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही बस पुणे-सातारा रस्त्यावर वरवे (ता.भोर) गावच्या हद्दीत आली. यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस  सेवा रस्त्यावर उलटली. 

अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलिस, महामार्ग पोलिस आणि महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरीकांच्या मदतीने बसच्या काचा फोडून त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात ज्ञानेश्वर थोरात यांचा मृत्यु झाला, तर अकरा प्रवासी जखमी झाले. त्यातील एक जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

या अपघातानंतर काही वेळ पुणे-सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र महामार्ग पोलिस आणि महामार्ग पेट्रोलिंग पथकाने क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.फौजदार मोहन तलबार पुढील तपास करत आहेत.

Web Title: Pune news one dead in accident