शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी सुरू

युनूस तांबोळी
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): कांद्याच्या बाजारभावावरून नेहमीच कांदा गाजत असलेला पहावयास मिळतो. या कांद्यावरून राजकिय घडामोडी होऊन विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थीत केले जातात. पण हाच कांदा पुन्हा बाजारपेठेत येण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग होतच असते. या वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी सुरू झाल्या आहेत.

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): कांद्याच्या बाजारभावावरून नेहमीच कांदा गाजत असलेला पहावयास मिळतो. या कांद्यावरून राजकिय घडामोडी होऊन विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थीत केले जातात. पण हाच कांदा पुन्हा बाजारपेठेत येण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग होतच असते. या वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी सुरू झाल्या आहेत.

रब्बी हंगामातील कांद्याची लागवड महत्वाची मानली जाते. त्यामुळे ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात प्रामुख्याने कांदा लागवडी केल्या जातात. दिवाळीत बाजारभाव मिळावा यासाठी हाच कांदा शेतकरी कांदा चाळीत ठेवताना दिसतो. या काळात मिळालेल्या कमी बाजारभावावरून कांदा रडविताना जाणवतो. मोठ्या प्रमाणात कांदा पिकला गेला तर बाजारभाव कमी मिळत असतो. त्यापलीकडे कांद्याची निर्यात झाली तर काहीवेळा अधिकचा भाव मिळू शकतो. मात्र असे होणे दुर्मीळ असते. या काळात शेतकऱ्यांकडे कांदा नसल्याचे दिसते. कांदा चाळीत साठवलेल्या कांद्याला बाजारभाव मिळतो. मात्र कधी कधी हा कांदा सडण्याचे प्रमाण अधिक असते. एकंदर कांदा हे पिक नाशवंत असले तरी त्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून आर्थीक प्राप्ती होऊ शकते. या वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे परीसरातील नाले, तलाव, बंधारे भरलेले आहेत. त्याचा फायदा घेत कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. पाण्याची उपलब्धता पहाता पाटपाण्याने लागवडी खालील कांद्याचे क्षेत्र पहावयास मिळत आहे. ठिबकसिंचन वरील कांदाक्षेत्र कमी प्रमाणात पहावयास मिळत आहे. बाजारभाव मिळेल या आशेने हा रब्बी हंगामातील कांदा लागवड झाला आहे. कांदा लागवडीसाठी एक महिला शेतमजूरावर साडेतिनशे रूपये खर्च होतो. त्यात महागडे रोप व इतर लागवडीसाठी लागणारा खर्च यामुळे कांद्याचे पिक घेणे परवड नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात.

सध्याच्या कोरड्या व थंड हवामानामुळे कांदा पिकावरील फुलकिडीची शक्यता आहे. हि किड नियंत्रणासाठी डायेमेथोएट 30 टक्के प्रवाही 15 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 6 मिली या किटकनानाशकांच्या प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारण्या कराव्यात, असे हवामान खात्याने सुचविले आहे.

कांदा कांदा पिकविल्यानंतर शेतकरी तातडीने बाजारपेठेत नेत असतो. मागणी पेक्षा पुरवठा वाढल्याने कमी बाजारभाव मिळतो. त्यातून अनेक शेतकरी हे आर्थीक संकटात सापडलेले पहावयास मिळतात. या वर्षी कांद्याला बाजारभाव मिळावा ही एकमेव अपेक्षा असल्याने कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे शेतकरी सुरेश भाकरे यांनी सांगितले.
 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news Onion cultivation started in Shirur taluka