कांदा निर्यात अनुदानास मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - कांदा निर्यात अनुदानास जुलै ते सप्टेंबर असे तीन महिने मुदतवाढ देण्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी  ‘सकाळ’ला दिली. ‘सकाळ’ने या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि डॉ. भामरे यांनी बुधवारी अर्थमंत्री जेटली यांची भेट घेतली व जूनअखेर संपणाऱ्या कांदा निर्यात अनुदान योजनेस मुदतवाढीची मागणी केली. सुमारे वीस महिन्यांपासून कांदा बाजारात मंदी असून, गेल्या उन्हाळ हंगामातही उच्चांकी उत्पादन झाल्याचे निदर्शनास आणून दिले. 

देशांतर्गत बाजारात अतिरिक्त ठरू पाहणारे उत्पादन निर्यातीच्या माध्यमातून हलके करण्यासाठी अनुदान सुरू ठेवणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावर जेटली यांनी पुढील तीन महिने अनुदान सुरू ठेवण्यास मान्यता देत तसे निर्देश देण्यात येतील, असे सांगितले.

‘‘निर्यात अनुदानामुळे गेल्या आर्थिक वर्षांत इतिहासातील सर्वाधिक कांदा निर्यात झाली आहे. कांद्याचे बाजारभाव किफायती पातळीवर आणण्यासाठी यापुढेही पाठपुरावा सुरू राहील,’’ असे डॉ. भामरे यांनी सांगितले. देशात सर्वाधिक कांदा उत्पादन करणाऱ्या धुळे - मालेगाव या लोकसभा मतदारसंघाचे डॉ. भामरे प्रतिनिधित्व करतात.

Web Title: pune news onion export subsidy

टॅग्स