ऑनलाइन श्‍वान विक्रीच्या बहाण्याने फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे - ऑनलाइन बॅंकिंगद्वारे परस्पर पैसे काढल्याची, तर कधी एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना अधून-मधून घडत असतात. मात्र, चक्‍क ऑनलाइनद्वारे श्‍वान विक्रीच्या बहाण्याने मर्चंट नेव्हीमधील अधिकाऱ्याच्या पत्नीला लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने पश्‍चिम बंगालच्या तरुणाला अटक केली आहे. त्याने पुण्यासह परराज्यांतील ३० ते ४० नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

राजन जनार्दन शर्मा (रा. औंध, मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमधील येथील एका अधिकाऱ्याला त्यांची पत्नी रचना यांना भेट म्हणून उच्च प्रजातीचा श्‍वान द्यावयाचा होता. त्यामुळे या दाम्पत्त्याने इंटरनेटवर शोध घेतला. त्यांना क्‍विकर संकेतस्थळावर क्रॉकस पॅनीयल प्रजातीच्या श्‍वानाबाबत जाहिरात दिसली. त्यांनी संबंधित क्रमांकावरील व्हॉट्‌सॲपवर संदेश पाठविला. त्यावर पैसे जमा केल्यानंतर पार्सलद्वारे घरी श्‍वान पाठविण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्या व्यक्‍तीच्या बॅंक खात्यात आठ हजार रुपये भरले; परंतु त्याने श्‍वान न देता त्यांची फसवणूक केली. 

याप्रकरणी रचना यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यावरून कोंढवा पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल चॅटिंगवर झालेल्या माहितीच्या आधारे आणि संबंधित संकेतस्थळाकडून आरोपीचा शोध घेतला. त्यावर राजन शर्मा याने फसवणूक केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पुण्यातील कोंढवा, येरवडा, हिंजवडी येथील दहा जणांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि केरळ राज्यातील नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त मिलिंद पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, कर्मचारी दीपक भोसले, किरण अब्दागिरे, आदेश चलवादी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अशी लढवली शक्‍कल
राजन शर्मा याची एका नायजेरियन व्यक्‍तीने श्‍वान विक्रीच्या बहाण्याने फसवणूक केली होती. त्या नायजेरियन फ्रॉडला बळी पडल्यामुळे शर्मा यानेही हीच शक्‍कल लढवत काही नागरिकांना हजारो रुपयांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: pune news online Dog sale