ऑनलाइन खरेदीला बहर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पुणे - आकर्षक आकाशकंदील असो वा रंगीबेरंगी दिवे... सजावटीसाठी झिरमिळ्या असो वा विद्युत रोषणाईचे दिवे... महालक्ष्मीची सुंदर मूर्ती असो वा धार्मिक विधींची पुस्तके... हे सगळं ऑनलाइन मिळत असेल तर... हे खरंय... पण, कुठेतरी याच ट्रेंडमुळे बाजारापेठांसोबतच ऑनलाइन खरेदीलाही बहर आला आहे. घरबसल्या कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत अशा कित्येक वस्तूंच्या खरेदीच्या ऑर्डर दिल्या जात आहेत. ऑनलाइन शॉपिंगवर खास ऑफर्सही मिळत असल्यामुळे लोकांचा कल ऑनलाइन शॉपिंगकडेही वाढला आहे. 

यंदा विविध संकेतस्थळांनी दिवाळीनिमित्त वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती दिल्या आहेत. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या जोडीला सजावटीच्या साहित्यामध्ये विशेष ऑफर्स दिल्या असल्याने लोकांकडून ऑनलाइन शॉपिंगवर भर दिला जात आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्यासह घरबसल्या वस्तू ऑर्डर करून पुणेकर दिवाळीची खरेदी करत आहेत. ऑनलाइन संकेतस्थळावर विद्युत रोषणाईचे दिवे, वॉल हॅंगिंग अशा वस्तूंच्या जोडीला आकाशकंदीलचे वेगवेगळे प्रकार पाहता येतील.

यासोबतीला महिला-युवतींसाठी डिझायनर कपडे, दागिने, फूटवेअर आणि सौंदर्य प्रसाधने पाहायला मिळतील. तर पुरुषांसाठीही स्टायलिश कपड्यांची आकर्षक रेंज पाहता येईल. या आणि अशा विविध वस्तू ऑनलाइन संकेतस्थळावर आणि ॲपवर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. 

याबाबत पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया म्हणाले, ‘‘ऑनलाइन शॉपिंगकडे लोकांचा कल वाढला आहे, हे खरे असले तरी प्रत्यक्ष बाजारात येऊन खरेदी करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये अजूनही 

म्हणावी तशी गर्दी झालेली 
नाही. पण, एक-दोन दिवसांत नक्कीच वाढेल. लोकांनी हे लक्षात घ्यावे की, प्रत्यक्ष बाजारात येऊन केलेली खरेदी खात्रीशीर असते. पण, ऑनलाइन खरेदीत आपण फक्त एक छायाचित्र पाहून वस्तू ऑर्डर करतो, ही बाब खात्रीलायक वाटत नाही.’’

पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत सवलत
ऑनलाइन खरेदीवर १० ते ५० टक्‍क्‍यांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्याशिवाय, गिफ्ट व्हाउचर आणि एक्‍स्चेंज ऑफर्सची लयलूटही अनुभवता येत असल्याने ऑनलाइन शॉपिंगला पसंती मिळत आहे. झिरमिळ्यांपासून ते रांगोळी स्टिकर्सपर्यंतच्या वस्तूंवर १० ते ५० टक्के तर मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबवर २० ते ५० टक्के सवलत दिली जात आहे.

मी दिवाळीसाठी ऑनलाइन शॉपिंगवर भर दिला आहे. कुर्ता-पायजमा ऑनलाइन ऑर्डर केला आहे. त्यावर मला डिस्काउंटही मिळाला आणि घरबसल्या शॉपिंगही करता आली.
- सौरभ शेळके

Web Title: pune news online purchasing