सेंद्रीय शेतीसाठी 'आत्मा'कडून प्रत्येकी 15 लाखांपर्यंत अनुदान 

श्रीकृष्ण नेवसे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सेंद्रीय शेती बाजारमूल्य वाढविते...
सुनिल बोरकर म्हणाले., पुरंदर तालुक्यात भाजीपाला पिके व फळपिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या पिकास जीवामृताचा वापर वाढविल्यास शेतीचे आरोग्य सुधारेल. कोणतेही रोग किड कमी होताना.. उत्पादन वाढ दिसेल. त्यासाठीच सेंद्रीय शेती प्रशिक्षण, प्रमाणिकरण, सेंद्रीय निविष्ठांव्दारे सेंद्रीय शेती फायद्याची ठरेल. सेंद्रीय शेतीमालाचे बाजारमुल्य अधिक असते, त्याचा फायदा शेतकऱयांना होईल.  

सासवड (ता. पुरंदर) : शेतकऱयांचे सेंद्रीय शेती गट केले, तर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने संबंधित गटास प्रत्येकी 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. यातून सेंद्रीय निविष्ठा वापरत.. देशी गायी पाळल्या व सेंद्रीय पध्दतीने पिके घेतली तर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास व उत्पादित शेतीमालातून मानवी आरोग्यास सुरक्षित करण्यास मोलाची मदत होते., असे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) संचालक सुनील बोरकर यांनी सासवड येथे सांगितले.  

पुणे जिल्ह्यात असे 40 गट पाहिल्या टप्प्यात झालेत, तर पुरंदर तालुक्यात 8 गावांत गट झाले आहेत. जिल्ह्यात अजून 22 गट प्रत्येकी 50 एकर क्षेत्रानुसार होत आहेत. सेंद्रीय शेती प्रशिक्षण, प्रमाणिकरण, सेंद्रीय निविष्ठांसाठी अनुदान.. असा गटनिहाय 15 लाख अनुदान खर्च तीन वर्षात होईल, असेही बोरकर म्हणाले. सासवड (ता. पुरंदर) येथील तालुका पंचायत समितीच्या सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शेतकरी कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. त्यात बोरकर बोलत होते. यावेळी कृषी तज्ज्ञ व अंजीर सीताफळ संशोधन केंद्राचे निवृत्त प्रकल्प अधिकारी डाॅ. विकास खैरे, अंजीर सीताफळ संशोधन केंद्राचे तज्ज्ञ अधिकारी डाॅ. सुनिलो लाहोटी, शेतकरी - शास्त्रज्ञ मंचाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सस्ते, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, आत्माचे सहायक व्यवस्थापक गणेश जाधव, स्मिता वरपे आदी मान्यवर उपस्थित होते. 

बोपगाव, माळशिरस येथे सेंद्रीय शेती गट शेतकऱयांनी केले. त्यातून तेथील शेतकरी कर्नाळ (हरियाना) येथून गावरान गायी प्रति सत्तर हजार रुपये किंमतीने सामुहिक पध्दतीने आणणार आहेत. गावरान गायीचे दुध साठ ते एेंशी रुपये लिटरने जाते. त्याचे शेण, गोमूत्र पिकास सेंद्रीय म्हणून परिणामकारक ठरते., असे सांगून बोरकर म्हणाले., सेंद्रीय शेतीत देशी गायींचा फार उपयोग असतो. त्यासाठी मुरघासाव्दारे चाऱयाचा प्रश्न सोडविता येतो. एकदा पाच गुंठे मका केली, तर तो मुरघास पध्दतीने साठवून हा चार टन चारा वर्षभरास एका गायीस पुरतो. जर्शी गायीमध्येही पोटात नवनिर्मिती म्हणून गावरान गायी सुधारीत तंत्राने वाढविता येते. एक नवी देशी गायी घेण्याचा खर्च 70 ते 80 हजार नको असेल.. तर त्याचे तंत्र जे. के. ट्रस्टकडून अगदी दोन ते तीन हजारांत मिळू शकते. ज्या शेतकऱयाकडे देशी गायी असेल तोच शेतकरी सेंद्रीय शेती चांगली करु शकतो. भविष्यात देशी गायीच्याच दुधाला महत्व येणार आहे. त्यासाठीच सेंद्रीय शेती करु इच्छिणाऱया शेतकऱयांना `आत्मा` अधिकाधिक मदत करीत आहे. तसेच शेतकऱयांनी गट करून पुढे यावे, त्यांनाही मदत केली जाईल.      

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news organic group farming subsidy by aatma