दिवाळीसाठी खास आउटफिटची क्रेझ!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

पुणे - स्वप्नालीला डिझायनर लेहंगा, तर पूजाला स्टायलिश घागरा डिझाइन करून हवा होता...मग काय? दोघींनी फॅशन डिझायनरला त्यांना हवा तसा लेहंगा आणि घागरा शिवण्यासाठीची ऑर्डर दिली...अन्‌ दिवाळीसाठी त्यांच्या पसंतीनुसार खास डिझायनर आउटफिट त्यांना तयार करून मिळाला. 

पुणे - स्वप्नालीला डिझायनर लेहंगा, तर पूजाला स्टायलिश घागरा डिझाइन करून हवा होता...मग काय? दोघींनी फॅशन डिझायनरला त्यांना हवा तसा लेहंगा आणि घागरा शिवण्यासाठीची ऑर्डर दिली...अन्‌ दिवाळीसाठी त्यांच्या पसंतीनुसार खास डिझायनर आउटफिट त्यांना तयार करून मिळाला. 

दिवाळीमध्ये काहीतरी हटके आणि वेगळे करण्यासाठी फॅशन डिझायनरकडून कपडे तयार करून घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. युवतींकडून ‘इंडो-वेस्टर्न’ प्रकारातील प्लाझो-कुर्तीज, तर मुलांकडून मोदी जॅकेट, पांढरा शर्ट आणि जीन्सला यंदा पसंती मिळत आहे. त्यामुळे सध्या फॅशन डिझायनरकडे गर्दी वाढली असून, दिवाळीत काहीतरी हटके घालण्यासाठी फॅशन डिझायनरने तयार केलेल्या आउटफिटला पसंती मिळत आहे. 

बजेटप्रमाणे आणि आवडेल त्या डिझाइनमध्ये फॅशन डिझायनर कपडे तयार करून देत आहे. ब्लाऊजचे हटके डिझाइन असो अथवा अनारकली...दिवाळीत आपला लुक हटके असला पाहिजे यासाठी गेल्या एक महिन्यापासूनच ऑर्डर दिल्या आहेत. 

दिवाळीच्या निमित्ताने पारंपरिकतेच्या जोडीला जरा वेस्टर्न ‘टच’ असणारे ‘इंडो-वेस्टर्न’ कपडे शिवून घेण्यावर भर दिला जात आहे. स्ट्रीट आणि मॉल शॉपिंगच्या पलीकडे जात ‘डिझायनर आउटफिट’साठी फॅशन डिझायनरकडे जाण्याचा ट्रेंड युवक-युवतींमध्ये वाढला आहे.  

‘इडो-वेस्टर्न’ची चलती
युवतींकडून ‘इंडो-वेस्टर्न’ प्रकारात प्लाझो-कुर्तीज, घागरा, अनारकली ड्रेस, फॅन्सी ब्लाऊज आणि साड्या, पंजाबी ड्रेस, लेहंगा वेगळ्या पद्धतीने डिझाइन करून ते शिवून घेतले जात आहे, तर युवकांकडून मोदी जॅकेट, शर्ट, पॅंट, कुर्ता-पायजमा, शेरवानी शिवून घेण्यास पसंती मिळत आहे. हवे ते डिझाइन आणि वर्क असावे, याकडे ते प्राधान्याने लक्ष देत आहेत. अगदी ३ ते १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये फॅशन डिझायनरकडून हे आउटफिट शिवून दिले जात आहे.

दररोज तीन ते चार युवक-युवतींची ऑर्डर येत असून, एक ते चार हजार रुपयांच्या बजेटनुसार त्यांना कपडे डिझाइन करून देत आहोत. गेल्या महिन्यापासून मागणी वाढली आहे. दिवाळीसाठी आउटफिट हटके असावा, यावर युवक-युवतींचा भर आहे.
- सायली भंडारे-मेकडे, फॅशन डिझायनर 

‘पफ’ असलेल्या फॅन्सी ब्लाउजसह साड्यांवर आकर्षक वर्क करून घेतले जात आहे. ‘इंडो-वेस्टर्न’टच दिलेल्या घागऱ्यासह अनारकली पॅटर्नचे ड्रेसही शिवून घेण्यात येत आहेत.
- अस्मिता भोर-अहेर, फॅशन डिझायनर

Web Title: pune news outfir craze for diwali