महिला श्रमिक इथं कशी घेणार विश्रांती!

गायत्री वाजपेयी 
बुधवार, 5 जुलै 2017

शिवाजीनगर एसटी बस स्थानकातील स्थिती

पुणे - वेळ सकाळी अकराची... फलाटावर निघण्यासाठी सज्ज असलेली एसटी बस... एवढ्यात एक प्रवासी आला आणि ड्रायव्हरशेजारील वाहकासाठी आरक्षित जागेवर जाऊन बसला... या बसची वाहक महिला होती...  हे पाहून तो आणखीन बिंधास्तपणे त्याच जागेवर ठाण मांडून बसला... महिला वाहकाने अनेकदा सांगूनही तो त्या जागेवरून उठण्यास तयार नव्हता, शेवटी ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या मध्यस्थीने त्याला बाहेर काढण्यात आले, ही घटना शिवाजीनगर एसटी बस स्थानकात घडली. 

प्रवाशांची अरेरावी, प्रशासनिक त्रास, कामाच्या वेळांमधील विसंगती, महिला विश्रामगृहांची झालेली दुरवस्था इत्यादी समस्यांमुळे स्वारगेट आणि शिवाजीनगर एसटी स्थानकामधील महिला वाहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

याबाबत वाहक सुजाता पांढरे म्हणाल्या, ‘‘महिला वाहकांना विश्रामगृहात चांगल्या सुविधा नाही. आगारात सुमारे ४० महिला वाहक आहेत. बहुतांश महिला वाहकांना विश्रांतीसाठी तीन ते पाच तास मिळतात. मात्र विश्रामगृहात केवळ एकच पलंग आहे. त्या ठिकाणी चादरी नसतात, आहे त्यादेखील इतर कर्मचारी वापरतात. अशा वेळी एकापेक्षा जास्त महिला थांबल्यास त्यांची गैरसोय होते. येथील बाथरूममध्ये पाणीदेखील नसते. त्यामुळे विश्रामगृह असूनही त्याचा फारसा उपयोग होत नाही.’’ 

कर्मचारी परवीन शेख म्हणाल्या, ‘‘अनेकदा गाड्यांच्या चौकशीसाठी येणाऱ्या प्रवाशांना योग्य उत्तरे देऊनही काही उर्मटपणे वागतात. काही वेळेला तांत्रिक अडचणींमुळे गाडी उशिरा येते, अशा वेळी समजून न घेता आमच्या बरोबर वाद घालतात. एसटी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली, तर लक्ष घालण्यापेक्षा त्यांच्याकडून कारवाई होण्याचीच जास्त भीती असते.’’

वाहक महिला कर्मचाऱ्यांना लवकर सुटी मिळत नाही. प्रवाशांकडून तर गैरवर्तणूक होतेच प्रशासनही आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करते. एखाद्या समस्येबाबत तक्रार केलीच तर त्यावर ‘नंतर पाहू’, बघू अशा प्रकारची टाळाटाळ केली जाते.
- अनिता संकपाळ, वाहक

एसटी प्रशासनाकडून महिला वाहकांच्या सुविधा नेहमीच ऐकून घेतल्या जातात आणि आवश्‍यक तेथे कारवाईदेखील केली जाते. मात्र एसटी ही सेवा देणारी संस्था असल्यामुळे प्रवाशांवर कडक कारवाई करता येत नाही. तसेच महिलांना शक्‍य तो रात्रपाळी अथवा रात्री मुक्काम होईल अशी ‘ड्यूटी’ दिली जात नाही.
- व्ही. एस. भोसले, आगारप्रमुख, शिवाजीनगर बस स्थानक

Web Title: pune news ow do women workers rest here?