पंधरा वर्षांत पडलेले खड्डे तीन वर्षांत कसे बुजणार - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पुणे - ‘पंधरा वर्षे सत्तेत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कारभारामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांसमवेत अनेक राजकीय नेते ‘सेल्फी’ काढत आहेत. हे विरोधक जागे असल्याचे लक्षण आहे; परंतु पंधरा वर्षांत रस्त्यांवर पडलेले खड्डे तीन वर्षांत कसे काय बुजणार,’ असे सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या ‘सेल्फी’वर शुक्रवारी अप्रत्यक्ष टीका केली. 

पुणे जिल्हा परिषदेत ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने’च्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होत्या. 

‘मी लाभार्थी’ जाहिरातीवरूनदेखील विरोधक विनाकारण राजकारण करीत आहेत. त्या जाहिरातीद्वारे राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ गतीने कसा मिळाला हे लाभार्थी सांगत आहेत. त्या शेतकऱ्यांना ‘टार्गेट’ करून विनाकारण छळण्याचे काम विरोधक करीत आहेत. त्यांना योजनांचा लाभ मिळाला किंवा नाही, याची शहानिशा मुख्यमंत्री कार्यालयाकडून केली गेली आहे. मी स्वतः पुणे जिल्ह्यातील एका लाभार्थीशी संवाद साधला आहे. या संकल्पनेला सकारात्मकपणे स्वीकारले पाहिजे.’’

धनंजय मुंडे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलेल्या वक्‍तव्याबद्दल बोलताना मुंडे म्हणाल्या, ‘‘ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची संकल्पना आमची होती. त्याला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यास उशीर झाला असला तरी, त्यामध्येही विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे त्यांचे नेतृत्व आमच्याकडे आले. ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, नोकऱ्यांचे प्रश्‍न प्रामाणिकपणे सोडविले जातील. लवादाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, तो प्रश्‍नदेखील मार्गी लावू. धनंजय मुंडे यांच्या सूचनांचा विचार करू.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news pankaja munde supriya sule Potholes issue