समान पाणीपुरवठा योजनेसाठी मुदतवाढीनंतरही एकच नवी निविदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - शहरातील बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेच्या सहा टप्प्यांपैकी पाच निविदांना मुदतवाढीनंतरही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी मुदतवाढीनंतर एकच निविदा आली. आलेल्या सर्व निविदांची तांत्रिक छाननी मंगळवारी करून पुढील प्रक्रिया राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांचे एकूण सहा टप्प्यांत विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचा समावेश असलेल्या या झोनच्या 295 कोटींच्या कामांसाठी आणि चौथ्या टप्प्यांतील कॅंटोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्राच्या झोनच्या 319 कोटींच्या कामांसाठी केवळ दोन निविदा आल्या आहेत. या कामांसाठी तीन निविदा येणे अपेक्षित होते; पण केवळ दोनच निविदा आल्याने त्यांना 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. त्यात "एसपीएमएल' या कंपनीची निविदा नव्याने आली आहे. त्यात "जैन इरिगेशन' आणि "एल ऍण्ड टी'ची निविदा या पूर्वी आली आहे. उर्वरित दुसऱ्या भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्र झोनच्या 319 कोटींच्या कामांसाठी "एल ऍण्ड टी', "लक्ष्मी', "एसपीएमएल' या तीनच निविदा आल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यातील वारजे आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्र झोनच्या 542 कोटींच्या कामासाठी "एल ऍण्ड टी', "एसपीएमएल' आणि "जैन इरिगेशन' यांच्या निविदा आल्या आहेत. पाचव्या टप्प्यातील वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या 469 कोटींच्या कामासाठी "एल ऍण्ड टी', "एसपीएमएल' आणि "जैन इरिगेशन'च्या निविदा आल्या आहेत. फक्त चौथ्या टप्प्यांतील कामांसाठी दोनच निविदा आल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक छाननीनंतर पुढील प्रक्रिया राबविण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.

Web Title: pune news parallel water supply scheme new tender