...इसलिए हम हर साल पूना आते हैं।

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

परप्रांतीय महिलांच्या भावना; गणेशजी के मेले में मिले पैसों से खेती करते हैं।

पुणे - ‘‘गणेशजी के मेले में कुछ पैसे मिलेंगे, इसलिए हम हर साल पूना में आते हैं। ब्रेसलेट, खिलौने बेचते है। उसी पैसों से कुछ महिने खेतीबाडी करते हैं।’’ अशा शब्दांत देशाच्या कानाकोपऱ्यांतून खास गणेशोत्सवादरम्यान छोट्या-मोठ्या वस्तू विकण्यासाठी येणाऱ्या महिला, पुरुषांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

परप्रांतीय महिलांच्या भावना; गणेशजी के मेले में मिले पैसों से खेती करते हैं।

पुणे - ‘‘गणेशजी के मेले में कुछ पैसे मिलेंगे, इसलिए हम हर साल पूना में आते हैं। ब्रेसलेट, खिलौने बेचते है। उसी पैसों से कुछ महिने खेतीबाडी करते हैं।’’ अशा शब्दांत देशाच्या कानाकोपऱ्यांतून खास गणेशोत्सवादरम्यान छोट्या-मोठ्या वस्तू विकण्यासाठी येणाऱ्या महिला, पुरुषांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

राजस्थान, गुजरातसह उत्तर भारतातली ही मंडळी सहा महिने उत्सवांमध्ये कलाकुसरीच्या वस्तू विकून पैसे मिळवितात. त्याच पैशांतून आपली गुजराण करत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी गणेशोत्सवात विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, फुलेविक्री करून त्यावर उदरनिर्वाह करणारी कुटुंबे पुण्यात दाखल होतात.

पदपथ, छोटीशी झोपडी किंवा दुकानांसमोरील छोट्याशा जागेतच आपले छोटे व्यवसाय करायचे. रात्री तेथेच मिळेल ते खायचे, झोपायचे आणि दुसऱ्या दिवशी कडेवर लहान मूल घेऊन ‘भैय्या खिलौने लेलो’ म्हणत या महिला व्यवसाय करत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. या महिला राजस्थान, गुजरात, बिहार आदी राज्यांतून आलेल्या आहेत. राजस्थानच्या कलमोरी, माधवपुरा या जिल्ह्यांमधील ५० हून अधिक कुटुंबे एकमेकांच्या आधाराने उत्सवामध्ये वस्तू विकत आहेत.

बांगड्या, विविध प्रकारच्या माळा, खेळणी, तांदळावर नाव कोरणे, मेहंदी काढणे, प्लॅस्टिकचे ब्रेसलेट बनविणे, उत्तर भारतातील प्रसिद्ध शाल, चादर, कपडे आणि अन्य कलाकुसरीच्या वस्तू विकण्याचे काम या महिला करत आहेत.

‘इनी पैसों से खेती करते हैं’
‘गणेशजी के मेले में हम हर साल आते हैं, लेकिन पहले दिनसेही बारीश शुरू हैं। इसलिये लोग माल नही ले रहे है ं। ऐसे मेले में मिलनेवाले पैसोंसेही हम खेतीबाडी करते हैं।’’ अशा प्रतिक्रिया काही महिलांनी दिल्या. या महिला व पुरुष सहा महिने उत्सवात व्यवसाय आणि उर्वरित सहा महिने कुटुंब व शेतीमध्ये लक्ष देतात. मुले, वृद्धांना घरी ठेवून फक्त नवजात बालकांनाच उत्सवकाळात ते आपल्याबरोबर ठेवतात. मात्र, यंदा पाऊस, पोलिस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या रोजीरोटीवर पाणी फिरविले जात असल्याची कैफियत त्यांनी मांडली.

उत्सवांतून सुटतो रोजीरोटीचा प्रश्‍न
दहीहंडी, गणपती (मुंबई, पुणे), नवरात्री (गुजरात), होळी (बिहार), दुर्गापूजा (कोलकता), गुरुपुरब (पंजाब), पोंगल (तमिळनाडू) यांसारख्या देशाच्या कानाकोपऱ्यांतील उत्सवांमध्ये या महिला- पुरुष वस्तूंची विक्री करण्यासाठी आवर्जून जातात. काही उत्सवांमध्ये वर्षभर पुरेल इतके पैसे मिळतात, तर काही उत्सवांमध्ये घरी परतण्यासाठीही पैसे राहात नाहीत, असे काही महिलांनी सांगितले.

आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यांतील उत्सवांमध्ये जातो. पुण्यातील गणेशोत्सवासाठी चार वर्षांपासून येत आहोत. मागील वर्षी दररोज २००-३०० रुपये मिळायचे; पण यंदा पावसामुळे वस्तू विकल्या जात नाहीत.
- सियाराम बावरिया, राजस्थान

Web Title: pune news parasitical women discussion