
राज्यातील खासगी शाळांनी कोरोनाच्या काळातही अवास्तव शुल्कवाढ केल्याच्या विरोधात इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशनने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली आहे.
पुणे (pune) - कोरोना काळातही राज्यातील खासगी शाळांनी अवास्तव शुल्क वाढ केली, एवढेच नव्हे तर शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबविले. शाळांच्या या मुजोरीबाबत पालक संघटनांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे धाव घेतली आहे.
धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या
राज्यातील खासगी शाळांनी कोरोनाच्या काळातही अवास्तव शुल्कवाढ केल्याच्या विरोधात इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशनने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली आहे. शैक्षणिक शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून डावलले जात आहे, तसेच या शाळांचे ऑडिटही झाले नसल्याची माहिती समोर येत आहे, असे असोसिएशनने आयोगाला कळविले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाच्या काळात अनेक पालकांना रोजगार गमवावा लागला आहे. तर अनेक पालकांच्या वेतनात कपात झाली आहे. यामुळे त्यांना शाळांचे शुल्क भरणे शक्य झाले नाही. यामुळे शाळांनी शुल्कवाढ करू नये, तसेच शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावू नये, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. परंतु काही शाळांनी शुल्क वाढ केल्याचे आणि शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबविल्याचे निदर्शनास येत आहे. शुल्क मिळत नसल्याने संस्थेचे कामकाज चालविणे अवघड होत असल्याचे संस्थाचालकांनी पालकांना सांगितले. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क आणि बस शुल्काची करू नये, असे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही कोणतीही पावले उचलली न गेल्याने असोसिएशनने आयोगाकडे दाद मागितली आहे.
पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे
विद्यार्थी शाळेतील कोणत्याही सुविधांचा लाभ घेत नसतानाही काही शाळांनी शुल्कवाढ केल्याचे दिसून आले आहे. याबाबत शाळांच्या यादीसह शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही कळविले. या यादीत राज्यातील जवळपास ८०, तर पुण्यातील २०हुन अधिक शाळांची नावे आहेत. परंतु, सरकारकडून अद्याप शाळांवर कोणतीही कारवाई न झाल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
- अनुभा सहाय, अध्यक्ष, इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशन