‘शैक्षणिक गॅझेट’ला पालकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पुणे - ‘मुझिकल लर्निंग पॅड’, ‘क्वीझ लॅपटॉप’, ‘पझलस’, ‘लर्निंग रिसोर्स’ अशा शैक्षणिक गॅझेट्‌ने बाजारपेठ सजली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बच्चे कंपनीचा अभ्यास ‘डिजिटल’ पद्धतीने व्हावा, यासाठी पालक शैक्षणिक गॅझेट्‌ला अधिक पसंती देत आहेत. मुलांना गेम्सच्या माध्यमातून अभ्यास करण्याची गोडी निर्माण व्हावी, यासाठी बाजारात ‘शैक्षणिक गॅझेट्‌स’चे पर्याय उपलब्ध झाले आहेत. ॲन्ड्रॉइडवर आधारित गॅझेटमध्ये गेम्स, पुस्तके आणि कार्टुन्स सीरिजला मुलांची पसंती मिळत असून, बाजारात ‘शैक्षणिक गॅझेट्‌’चा ट्रेंड रुळला आहे. 

घरामध्ये मोबाईलवर गेम्स खेळण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. त्यामुळे चिमुरड्यांच्या हातात मोबाईल कसा द्यायचा, या चिंतेत पालक असतात. मात्र आता शैक्षणिक गॅझेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. मुलांसाठी शैक्षणिक टॅब, गेमिंग कन्सोलही विक्रीसाठी बाजारात आले आहेत. हे गॅझेट्‌स हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मोबाईलपेक्षा गॅझेट्‌स बरे म्हणून पालकही ते मुलांना घेऊन देत आहेत.

शैक्षणिक गॅझेट वापरण्याचा कल वाढला आहे. गॅझेटवरील अभ्यासही सहजपणे करता येईल. संगणक आणि लॅपटॉपच्या साह्याने अभ्यास करता येईल. 
‘‘लहान मुलांमध्ये टॅब, पीएसपी, आयपॉड, मिनी लॅपटॉप या गॅझेट्‌ना अधिक पसंती मिळत आहे. मोबाईल पर्याय म्हणून पालकांकडून शैक्षणिक गॅझट्‌ला अधिक मागणी आहे. बौद्धिक क्षमता वाढविणारे गॅझेट्‌सही उपलब्ध झाली आहेत, ’’ असे विक्रेते संतोष पवार यांनी सांगितले. 

Web Title: pune news parents demand educational gazet