पार्किंगची वर्गवारी आणि दर

Parking-rate
Parking-rate

पुणे - महापालिकेच्या नव्या पार्किंग धोरणांतर्गत रस्ते, त्यावरील वाहनांची वर्दळ आणि त्यांच्या वेळांची पाहणी करून रस्त्यांची वर्गवारी तयार केली आहे. त्यानुसार वाहनांसाठी दर निश्‍चित केले आहेत. 
‘अ’ विभाग -  
फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, संचेती हॉस्पिटल चौक, जुना पुणे-मुंबई महामार्ग सौरभ हॉलपर्यंत, स्टेशन रस्ता, नेहरू रस्ता, शंकरशेठ रस्ता, शिवाजी रस्ता, नेहरू स्टेडियम रस्ता, सारसबाग रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, गणेश चौक, कुमठेकर रस्ता.

‘ब’ विभाग  -
कर्वे रस्ता - वारजे पूल ते कर्वे पुतळा चौक ते खंडूजीबाबा चौक. पौड रस्ता - कोथरूड बस डेपो ते पौड फाटा. सिंहगड रस्ता - दांडेकर पूल ते धायरी फाटा. सातारा रस्ता - स्वारगेट चौक ते कात्रज चौक. बिबवेवाडी रस्ता - हॉटेल लोकेश चौक ते अप्पर इंदिरानगर बस डेपो. सोलापूर रस्ता - पुणे कॅंटोन्मेन्ट- स्वारगेट चौक ते हडपसर गाडीतळ. खराडी बायपास - मगरपट्टा चौक ते खराडी बायपास पोलिस चौकी. आळंदी रस्ता - संगमवाडी पूल ते विश्रांतवाडी चौक. सम्राट अशोक रस्ता- नगर रस्ता - केंद्रीय विद्यालय ते सातव हायस्कूल. गणेशखिंड रस्ता ते औंध गाव - संचेती चौक ते औंध नाका. बाणेर रस्ता - पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेल चौक. जुना मुंबई-पुणे महामार्ग खडकी कॅंटोन्मेन्ट वगळून - इंजिनिअरिंग कॉलेज चौक ते हॅरिस पूल. जवाहरलाल नेहरू रस्ता - सेव्हन लव्हज चौक ते गंगाधाम चौक. वेलेस्ले रस्ता - सौरभ हॉल ते बंडगार्डन पूल.

‘क’ विभाग -
‘अ’ आणि ‘ब’ विभाग वगळता उर्वरित परिसर.

वाहनचालक, नागरिक म्हणतात...
गजानन कराळे -
 रिक्षावाल्यांचा व्यवसाय आधीच कमी झाला आहे. तसेच घर चालवणे व वाहनाचा खर्च वगळता काहीच पैसा हाती राहत नाही. येथील रिक्षावाल्यांची घरे लहान असतात. अशा वेळी ते घराबाहेर रस्त्यावर त्यांची वाहने लावतात. त्यासाठीही आता पैसे घेतले, तर रिक्षावाल्यांच्या हातात काय राहणार?

समीर मारणे - जर सार्वजनिक वाहतूक सुधारली, तर लोकांना त्यांच्या गाड्या रस्त्यावर उतराव्या लागणार नाही. तसेच, ज्या रस्त्यांवर वर्दळ आहे अशा रस्त्यांपासून जवळ पार्किंगची सुविधा द्या. म्हणजे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि वेळ वाचेल. त्यावर आधी काम झाले पाहिजे.

सागर अनभुले - ज्या ठिकाणी तुम्ही पार्किंगची चांगली सुविधा देता, अशा ठिकाणी पे अँड पार्किंग करावी व ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणीच पैसे घ्यावे. झिझियाकर लावल्यासारखा पेठांमध्ये हा नियम नको. कारण तिथे स्थानिकांचे जास्त हाल होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com