पिंपरी चिंचवड महापालिकेतील लेखाधिकाऱ्याला लाच घेताना अटक

रविंद्र जगधने
सोमवार, 31 जुलै 2017

सोमवारी (ता. 31) ही कारवाई करण्यात आली. याबाबत एका 29 वर्षीय तरुणाने एसीबीकडे तक्रार केली होती. 

पिंपरी : ठेकेदाराच्या बिलाची फाईल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची एक हजाराची लाच स्वीकारताना पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागातील लेखाधिकाऱ्याला लाचलुचपत (एसीबी) विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (ता. 31) करण्यात आली. याबाबत एका 29 वर्षीय तरुणाने एसीबीकडे तक्रार केली होती. 
किशोर बाबूराव शिंगे (वय 51, रा. रो-हाउस क्र.2, तुषार रेसिडेन्सी, कोकणे चौक, रहाटणी) असे अटक केलेल्या लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मामाचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे पाइपलाइन देखभाल दुरुस्ती करण्याचे काम आहे.

या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी बिलाची फाईल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी शिंगे याने एक हजाराच्या लाचेची मागणी केली. याबाबत ठेकेदाराच्या भाच्याने लाचलुचपत विभागाला कळवले. त्यानुसार एसीबीने सापळा रचून शिंगे याला एक हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: pune news PCMC corrupt clerk arrested