पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आर. एस. कुमार भाजपमध्ये

उत्तम कुटे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

फेब्रुवारी 2017 च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कुमार पराभूत झाले होते. गत सभागृहातील ते सर्वात ज्येष्ठ नगरसेवक होते.

पिंपरी: पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आर.एस.कुमार यांनी आज (ता.23 ) पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. हा राष्ट्रवादीला आणखी एक धक्का मानला जात आहे. पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून सहा वेळा नगरसेवक झालेल्या कुमार यांनी सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे. त्याला त्यांनीच दुजोरा दिला.अजित पवार यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पक्ष सोडण्याची  पाळी आल्याचेत्यांनी सांगितले.

वीस वर्षापूर्वी ते कॉंग्रेसमध्ये असताना महापौर ह़ोते.त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले. 2012 ला ते सहाव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गत सभागृहातील ते सर्वात ज्येष्ठ नगरसेवक होते. फेब्रुवारी 2017 च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पराभूत झाले होते.

खासदार अमर साबळे यांनी प्राधिकरणात आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह मेळाव्यात कुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.खासदार अमर साबळे, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, भाजप प्रदेश सदस्य सदाशिव खाडे,. नगरसेवक माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, महिला शहर अध्यक्ष शैला मोळक
आदी यावेळीउपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news pcmc ex mayor rs kumar joins bjp