पेडल सायकलची पुणेकरांमध्ये क्रेझ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पेडल सायकल आरोग्यास लाभदायक आहे. पर्यावरणपूरक सायकल चालविण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. यामुळे वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळत आहे.
- भाग्यश्री बोदडे, विद्यार्थिनी

पुणे - शहरातील नागरिकांमध्ये ‘पेडल’ सायकलची क्रेझ पाहायला मिळत आहे. दोन रुपयांमध्ये तासभर वापरता येणाऱ्या या सायकली शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिसत आहेत. प्ले-स्टोअरवरील ॲप्लिकेशनचा आधार घेत नागरिक सायकलचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

राज्यातील पुणे-मुंबईसह चेन्नई, बंगळूर, कलकत्ता, उदयपूर, जयपूर, आग्रा या शहरांत पेडल सायकलची सेवा उपलब्ध आहे. शहरातील फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, बीएमसीसी महाविद्यालय रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, पुणे विद्यापीठ, औंध या भागांत पेडल सायकलचे तळ आहेत. बंगळूर येथील झूमकार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही संकल्पना अमलात आणली आहे. मोटारसायकलची सवय जडण्याआधी सायकलचा वापर सुरू होता. मोटारसायकलचा वापर वाढल्याने सायकल वापरातून कालबाह्य होत आहे. तरीही पेडल सायकलचा वापर वाढताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये याचे आकर्षण आहे.

शहरात सेवा उपलब्ध
 सायकलचे भाडे द्या ‘पेटीएम’द्वारे
 तासाभरासाठी दोन रुपये
 तरुणांमध्ये विशेष आकर्षण
 शहरातील प्रमुख रस्‍त्‍यांवर उपलब्‍ध

Web Title: pune news pedal cycle craze