चऱ्होलीतील चिमुरडीचे अपहरण करून हत्या 

रविंद्र जगधने
मंगळवार, 4 जुलै 2017

तनिष्का अमोल आरुडे (रा. कॉलनी क्र.6, साईनगर, वडमुखवाडी, चऱ्होली) असे त्या चिमुरडीचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

पिंपरी : चऱ्होली-वडमुखवाडी येथून 28 जून रोजी बेपत्ता झालेल्या चार वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार समोर आला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट अकोला जिल्ह्यात लावली असून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दिघी पोलिसांचे एक पथक अकोला येथे रवाना झाले आहे. 

तनिष्का अमोल आरुडे (रा. कॉलनी क्र. 6, साईनगर, वडमुखवाडी, चऱ्होली) असे त्या चिमुरडीचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तिची आई योगिता या मोठ्या मुलीला घेण्यासाठी शाळेत गेल्या, त्यावेळी तनिष्का शाळेतून घरी येऊन खेळत होती. तर वडील अमोल हे चिंचवड येथे गाडी दुरूस्तीसाठी गेले होते. त्यामुळे तनिष्का घरी एकटीच होती. योगिता या घरी परत आल्या असता त्यांना तनिष्का दिसली नाही.

त्यावेळी त्यांनी तिला आसपास शोधले मात्र, ती सापडली नाही. शेवटी अमोल यांनी दिघी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिचे अपहरण करून खून झाल्याचे समोर आले. 

Web Title: pune news pimpri chinchwad charholi abduction murder