प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सुविधांची वानवा

दीपेश सुराणा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पिंपरी (पुणे): शहरातील नाट्यकलाकार आणि नाट्य रसिकांना चांगल्या सुविधा असलेली नाट्यगृहे हवी आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सध्या विविध सुविधांची वानवा आहे. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे या नाट्यगृहाचे रूप पालटणार आहे. तर, नव्याने झालेल्या पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात देखील काही सुधारणा अपेक्षित आहे.

पिंपरी (पुणे): शहरातील नाट्यकलाकार आणि नाट्य रसिकांना चांगल्या सुविधा असलेली नाट्यगृहे हवी आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सध्या विविध सुविधांची वानवा आहे. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे या नाट्यगृहाचे रूप पालटणार आहे. तर, नव्याने झालेल्या पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात देखील काही सुधारणा अपेक्षित आहे.

* प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवडगाव ​​
- समस्या :

* बाल्कनीतील काही खुर्च्या तुटलेल्या
* स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता
* कलाकारांच्या ग्रीनरूममधील भिंती, कपाटांची दुरवस्था
* नाटकांच्या नेपथ्यासाठी दिल्या जाणाऱ्या लेव्हल तुटलेल्या स्थितीत
* वातानुकूलित सुविधेची क्षमता कमी असल्याने रसिकांची गैरसोय

- उपाययोजना :
* कलाकारांना नाटकाच्या रंगीत तालमीसाठी असावा छोटा हॉल
* बाल्कनीतील तुटलेल्या खुर्च्या, रंगमंचावरील विंगा, पडदे बदलण्याची गरज
* स्वच्छतागृहांची व्हावी नियमित साफसफाई
* कलाकारांच्या ग्रीनरूमचे व्हावे नूतनीकरण
* वातानुकूलित सुविधेची क्षमता वाढविणे आवश्‍यक
* नाटकांच्या नेपथ्यासाठी दिल्या जाणाऱ्या लेव्हल बदलण्याची गरज

"प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे नियोजन आहे. त्यामध्ये आरामदायी खुर्च्या, ऍटोमॅटिक वातानुकूलित व्यवस्था, त्याशिवाय नाट्यगृहातील अंतर्गत विविध सुधारणा केल्या जाणार आहेत.''
- एम. व्ही. भुतकर, प्रभारी व्यवस्थापक, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

* अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी
- समस्या :

* नाट्यगृहातील स्वच्छतागृह अस्वच्छ स्थितीत
* बाल्कनीजवळील स्वच्छतागृहाचा दरवाजा तुटलेला
* नाट्यगृहातील छताचे काही ठिकाणी "पीओपी' खराब स्थितीत
* स्वच्छतागृहातील पाण्याचे काही नळ नादुरुस्त
* अग्निशमन उपकरणे गंज लागलेल्या स्थितीत
* उपाहारगृहाची सुविधा नसल्याने बाहेरून मागवावे लागते खाद्यपदार्थ

- उपाययोजना :
* नाट्यगृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हवे सीसीटीव्ही कॅमेरे
* कलाकार व रसिकांसाठी व्हायला हवे स्वतंत्र उपाहारगृह
* कलाकारांना नाटकाच्या सरावासाठी हवा छोटा हॉल
* कलाकारांना विश्रांतीसाठी असावी स्वतंत्र सोय
* स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई आणि आवश्‍यक दुरुस्ती गरजेची

* आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर :
- समस्या :

* नाट्यगृह वीस वर्ष जुने असल्याने खुर्च्या, स्वच्छतागृह आदी भौतिक सुविधांची दुरवस्था
* आसनक्षमता कमी असल्याने मोठ्या कार्यक्रमांसाठी कमी पसंती
* पार्किंगची अपुरी सोय असल्याने कलाकार व रसिकांची गैरसोय

- सुरू असलेल्या उपाययोजना :
* 24 ऑगस्ट 2017 पासून नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला सुरवात
* नवीन खुर्च्या, फॉल्स, सिलींगचे काम, रंगमंचावरील मंडपी, स्वच्छतागृहांमध्ये होणार सुधारणा
* दुसऱ्या टप्प्यात इलेव्हेशन पद्धत, लॉबीचा विस्तार, वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग होणार

"आचार्य अत्रे रंगमंदिरात विविध सुविधा व्हाव्यात, या दृष्टीने सध्या नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे नाट्यगृह बंद ठेवले आहे. जुलैपर्यंत हे काम पूर्ण होईल. नूतनीकरणानंतर विविध सुविधायुक्त नाट्यगृह कलाकार व रसिकांना मिळू शकणार आहे.''
- विजय घावटे, प्रभारी व्यवस्थापक, आचार्य अत्रे रंगमंदिर.

* नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळेगुरव
- समस्या :

* नाट्यगृहासाठी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न
* वाहने पार्किंगमधून बाहेर काढण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने कलाकार व रसिकांची गैरसोय
* नियमित साफसफाई होत नसल्याने स्वच्छतागृहांतून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास

- उपाययोजना :
* तातडीने बसवायला हवे सीसीटीव्ही कॅमेरे
* पार्किंगमधून वाहने बाहेर काढण्यासाठी पुरेशी जागा वाढवावी.
* स्वच्छतागृहांच्या नियमित साफसफाईकडे लक्ष द्यावे.

अन्य नाट्यगृहांपेक्षा जादा सुविधा :
* दुसऱ्या मजल्यावर नाटकांच्या रंगीत तालमीसाठी मोकळी जागा उपलब्ध
* नाट्यगृहात सुमारे 250 आसन क्षमतेच्या बहुउद्देशीय सभागृहाची व्यवस्था

महापालिकेने नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी प्रयत्न करावा. नाट्यगृहांकडे फक्त उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता सुधारणा करण्यासाठी कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून नियोजन करावे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करावी. व्यावसायिक, हौशी नाटक, बालनाट्य स्पर्धा आदींसाठी तारखांचे योग्य नियोजन करावे. नाट्यगृहाचा व्यवस्थापक नेमताना केवळ नाट्यविषयक शैक्षणिक पात्रता न पाहता त्याची त्यामधील आवड देखील तपासावी.
​​- भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (मध्यवर्ती शाखा)

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ध्वनी यंत्रणा सुधारण्यासाठी ऍकोस्टिकमध्ये बदल करावा. कलाकारांना जेवणासाठी पुरेशी जागा, पिण्याचे पाणी आदी सुविधा द्याव्या. नाट्यगृहाच्या विंगा मोठ्या कराव्यात. कलाकारांना नाटकासाठी महापालिकेतर्फे अत्यल्प दरात सेट आणि तो लावण्यासाठी तज्ज्ञ मिळावेत. मेकअपरूम आणि बॅकस्टेजला स्वच्छता असावी. तेथील एसी सुस्थितीत असावा. रंगमंचावर घडणाऱ्या गोष्टी कळण्यासाठी मेकअपरूममधील स्पीकर सुरू करावे. नाट्यगृह नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच द्यावे.
- ​​डॉ. संजीवकुमार पाटील, नाट्य अभिनेते.

आचार्य अत्रे रंगमंदिर नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दोन कोटी 30 लाख इतका खर्च होणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी नव्याने निविदा मागविल्या आहेत. त्यासाठी चार कोटी रुपये खर्च होईल. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये सुमारे 60 लाख खर्च करून अत्यावश्‍यक दुरुस्ती केली. नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्यासाठी सध्या आर्किटेक्‍ट नेमण्याची प्रक्रिया झाली आहे.
- शिरीष पोरेडी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग.

Web Title: pune news pimpri chinchwad facilities issue in the theater