पिंकेथॉन ही महिला परिवर्तनाची सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पुणे - ""महिला सशक्तीकरण ही काही कोणती देणगी नाही, त्यासाठी महिलांनी स्वतः प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. सशक्तीकरण हे केवळ महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याशी निगडित नसून, महिलांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. ऑक्‍टोबर हा महिना ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी "पिंक रिबन मंथ' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पाचव्या पिंकेथॉनचे आयोजन केले आहे,'' अशी घोषणा अभिनेता मिलिंद सोमण यांनी पत्रकार परिषदेत केली. 

पुणे पिंकेथॉनची सुरवात 26 नोव्हेंबरला कल्याणीनगरमधील मुळीक ग्राउंड येथून होणार आहे. सोमण म्हणाले, ""पिंकेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून परिवर्तनाची सुरवात आहे. आपल्या स्वतःच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवणे, स्वत:चा सन्मान करणे आणि आपल्या मूल्यांना समजून घेऊन त्यांचा सन्मान करणे, हे सक्षमीकरणाचे पहिले पाऊल आहे. दरवर्षी पुणेकरांनी आपल्या सहभागातून पिंकेथॉनला उत्तम प्रतिसाद दिला आहे.'' 

या वेळी ट्रॅक अँड फील्ड धावपटू मान कौर, अभिनेत्री सई ताम्हनकर उपस्थित होते. पिंकेथॉनमध्ये दृष्टिहीन मुली विविध प्रकारांतील धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी खास ब्रेल लिपीतील पदक तयार केले आहे. त्यांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. तीन किलोमीटरमध्ये पळणाऱ्या दृष्टिहीन मुलींच्या स्क्वाडसाठी निवांत व्हिजनमधील दृष्टिहीन मुलगी अभया मुकुंद हिची शुभंकर म्हणून निवड केली आहे. या प्रकारात 30 श्रवणशक्तीबाधित मुलीही भाग घेणार आहेत.

Web Title: pune news pinkathon women