प्लॅस्टीक कचरामुक्त भारत करण्यासाठी काम करणार: स्वप्नाली भन्साळी

रमेश मोरे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

नुकतीच त्यांची मिसेस इंडिया युनिव्हर्स या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत जिंकणारी महिला पुढे मिसेस युनिव्हर्स २०१८ या आंतराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

जुनी सांगवी : जागतिक दर्जाच्या "मिस इंडिया युनिव्हर्स",या स्पर्धेनंतर भारत प्लँस्टीक कचरा मुक्त अभियान राबविणार असुन याच बरोबर भारतीय शास्त्रीय संगीत,गायन व नृत्याचा प्रसार व प्रचार करायचा असल्याचे दापोडी येथील स्वप्नाली भन्साळी यांनी जुनी सांगवी येथे त्यांच्या "मिसेस इंडिया युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल शिवशक्ती व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले.

नुकतीच त्यांची मिसेस इंडिया युनिव्हर्स या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत जिंकणारी महिला पुढे मिसेस युनिव्हर्स २०१८ या आंतराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

त्या बोलताना पुढे म्हणाल्या, मला शास्त्रीय संगीत, गायन व नृत्याचा तरूण पिढीला आवड निर्माण व्हावी म्हणुन स्वत:पासुन प्रचार व प्रसार करायचा आहे. राजस्थान येथील उदयपुर येथे ता.२२ ऑक्टो.ते २७ ऑक्टो.या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्वामी विवेकानंद शाळा दापोडी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलेल्या स्वप्नाली भन्साळी या साँफ्टवेअर ईंजिनियर आहेत. सध्या लंडन स्थित भन्साळी यांनी सप्टेंबर २०१७ मधे लंडन येथील मिसेस इंडिया युके या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतुन त्यांची मिसेस युनिव्हर्ससाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना मराठी, इंग्रजी, तेलगु, संस्कृत अशा भाषा अवगत असुन बासरी, शास्त्रीय संगीत गायन,व नृत्यकलेची आवड आहे. त्यांचा विवाह लंडन येथे युबीएस या बँकेत डायरेक्टर असलेल्या जुगाश चंदरलपाटी यांच्याशी झाला असुन त्यांना दोन वर्षाची मुलगी आहे. लहानपणापासुनच त्यांना विविध क्षेत्रात काम करण्याची आवड होती. आई निर्मला व वडील दिलिप भन्साळी यांनी प्रोत्साहन दिले. आपल्या देशातील शिक्षणात पुस्तकांतील धडे शिकविण्यावर भर दिला जातो. मात्र परदेशात कृती प्रँक्टीकलवर जास्त भर दिला जातो. ती शिक्षणपद्धती आपल्या देशात अवलंबली जायवा हवी असे ही मत तिने बोलताना व्यक्त केले.

याचबरोबर हा किताब जिंकल्यास मायदेशात येवुन मला शिक्षणापासुन वंचित मुलांवर काम करायचे आहे. याचबरोबर प्लॅस्टीक कचरा मुक्त अभियान राबवायचे असल्याचे यावेळी सांगितले. तिला तुषार धालिवाल, अर्चना तोमर, आदीती गुप्ता हे स्पर्धेसाठी मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमास नगरसेविका आरतीताई चोंधे, जैन काँन्फरन्स संस्थेचे प्रविण पगारिया, योगेश काळे, सतिश बढे, योगेश गायकवाड, तौसिफ हिप्परगी, स्री शक्ती महिला संघाच्या वंदना दाभाडे, कोमल काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन युवराजसिंह गायकवाड यांनी केले.

Web Title: Pune news plastic free india