मालकी नसतानाही पालिकेचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

पुणे - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर महापालिकेने गेल्या दहा वर्षांत सुमारे १३०० कोटी रुपये खर्च केले असल्याचे लेखी प्रश्‍न-उत्तरांतून उघड झाले आहे. त्यामुळे मालकी नसलेल्या रस्त्यांवर महापालिकेने खर्च केला कसा, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

शहरातून सहा राज्य महामार्ग आणि दोन राष्ट्रीय महामार्ग जातात, महापालिकेच्या हद्दीतून सुमारे १८ ठिकाणी हे रस्ते जातात. हे रस्ते महापालिकेकडे वर्ग केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. असे असतानाही या रस्त्यांवर खर्च केला असल्याचे या प्रश्‍नोत्तरातून समोर आले आहे. या खर्चात सर्वाधिक २०८ कोटी रुपये पुणे- नगर रस्त्यावर करण्यात आला असून, त्यात येरवडा ते महापालिका जकात नाक्‍यापर्यंत हा खर्च झाला आहे. तर पुणे- सातारा रस्त्यावर सुमारे २०७ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठीही प्रशासनाने खर्च केला आहे. या शिवाय पौड रस्ता, पुणे-मुंबई रस्ता, पुणे-बंगळूर रस्ता, पाषाण रस्ता, पुणे-आळंदी रस्ता, कात्रज ते खडी मशिन चौक, स्वारगेट ते नांदेड-सिटी या रस्त्यांवरही महापालिकेने खर्च केल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. नगरसेवक अविनाश बागवे यांनी या बाबत प्रश्‍न विचारला होता. हे रस्ते महापालिकेकडे सोपविण्यात आल्याची कोणतीही नोंदी प्रशासनाकडे नाही. तसेच त्याबाबत अधिसूचनाही प्रसिद्ध झालेली नाही.

Web Title: pune news pmc