भूखंड परत करण्याबाबत महापालिकेत आज निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे - सिंहगड रस्त्यावरील सुमारे अडीच एकराचा महापालिकेच्या ताब्यात असलेला भूखंड मूळ मालकाला परत करण्याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता. 29) होणार आहे. हा भूखंड परत करण्याबाबत महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचेही काही नेते या प्रकरणात सहभागी आहेत. 

सिंहगड रस्त्यावरील हा भूखंड महापालिकेने सुमारे 55 वर्षांपूर्वी ताब्यात घेतला आहे; मात्र नुकसानभरपाई दिली नसल्याचा दावा करत मूळ जागामालकाने भूखंड परत मिळावा, म्हणून महापालिका आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत न्यायालयातही याचिका प्रलंबित आहे. "हा भूखंड मूळ जागामालकाला परत देण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडे पाठवावा. राज्य सरकार जो निर्णय देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करावी,' असा ठराव स्थायी समितीने दोन आठवड्यांपूर्वी मंजूर केला आहे. या विषयावर गेल्या 15 दिवसांपासून महापालिकेत चर्चा सुरू आहे. आमदार माधुरी मिसाळ आणि मेधा कुलकर्णी यांनीही भूखंड परत करण्यास विरोध दर्शविला आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत याचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव मांडला असून, त्यावर प्रशासनाकडून अभिप्रायही मागविला आहे. स्थायीमध्ये मंजूर झालेला हा प्रस्ताव विशेष बाब म्हणून सर्वसाधारण सभेतही लगेचच दाखल केला आहे. दरम्यान, स्थायी समितीने या प्रस्तावावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वसाधारण सभेत हा विषय यापूर्वीच दाखल झाल्याने त्यावर सर्वसाधारण सभेतच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे नगरसचिव कार्यालयाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार हा भूखंड सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांचा आहे.

Web Title: pune news PMC