"स्थायी'कडून आज अर्थसंकल्प 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे - महापालिकेतील सत्ताधारी भाजप आपला दुसरा अर्थसंकल्प उद्या मंगळवारी (ता. 27) सादर करणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. त्यात भाजपकडून कोणते बदल करण्यात येणार याबाबत नगसेवकांमध्ये उत्सुकता आहे. 

पुणे - महापालिकेतील सत्ताधारी भाजप आपला दुसरा अर्थसंकल्प उद्या मंगळवारी (ता. 27) सादर करणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. त्यात भाजपकडून कोणते बदल करण्यात येणार याबाबत नगसेवकांमध्ये उत्सुकता आहे. 

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 2018-19 या आर्थिक वर्षासाठी सुमारे पाच हजार 397 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा स्थायी समितीसमोर मांडला आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या आराखड्यात स्थायी समितीकडून नेमके कोणते फेरबदल करून अर्थसंकल्प मांडण्यात येईल, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पीय आराखडा स्थायी समितीसमोर मांडताना तो वास्तववादी असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. 

महालिकेच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे आयुक्तांनी नव्या आर्थिक वर्षाचे गणित मांडताना गतवर्षीपेक्षा सुमारे तीनशे कोटी रुपयांनी कमीचे अंदाजपत्रक मांडले. मात्र, स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळ त्यामध्ये वाढ सुचविणार की आयुक्तांची तयार केलेल्या आराखड्याला मंजुरी देणार, याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. आयुक्तांनी वास्तवाचे भान ठेवत अंदाजपत्रकात फारसा फुगवटा ठेवला नाही. त्यांनी काही प्रकल्पांकरिता त्यात तरतूद केली नाही. त्यामुळे भाजपने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जाहीर केलेल्या प्रकल्पांना स्थायी समिती अध्यक्षांना तरतूद करावी लागणार आहे. त्यात वैद्यकीय महाविद्यालय, पश्‍चिम पुण्यात ससूनच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय, महिलांची सुरक्षा यासह अन्य प्रकल्पांचा समावेश आहे. 

Web Title: pune news PMC standing committee budget