आठशे बसगाड्या खरेदीला मंजुरी - तुकाराम मुंढे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती "पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिली.

येत्या दीड वर्षात सर्व बस खरेदी केल्या जातील. मात्र, त्यातील 400 "सीएनजी' आणि 400 "डिझेल'वरील बसगाड्या घेण्यात येणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. 

"पीएमपी' संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या निर्णयाची माहिती मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, संचालक सिद्धार्थ शिरोळे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन निकाळजे, स्थायीच्या अध्यक्ष सीमा सावळे आदी बैठकीला उपस्थित होते. 

""प्रदूषण रोखण्यासाठी "ग्रीन टेक्‍नॉलॉजी'ला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेण्यात आली असून, नव्यापैकी 400 बस "सीएनजी'वर धावणाऱ्या घेण्यात येतील. सध्या "पीएमपी'कडे या इंधनाचा वापर करणाऱ्या 1 हजार 226 बस आहेत. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील 65 टक्के बस सीएनजीवर धावतील, तर सुमारे 35 टक्के बस डिझेलचा वापर करतील. "सीएनजी'च्या बसचे प्रमाण अधिक असल्याने त्यासाठी नव्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. या इंधनाचा पुरवठा आणि डेपो वाढविण्याचे नियोजन आहे. तसेच, या इंधनाच्या दाबामुळे बसचे "ब्रेकफेल' होण्याचे प्रमाण अधिक असेल. ते कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. या बसखरेदीमुळे पीएमपीकडे 2 हजार 491 बस उपलब्ध होतील'', असे मुंढे यांनी सांगितले. 

प्रवासी मोजण्याचे यंत्र 
नव्या बसगाड्या स्वयंचलित राहणार असून, त्यातील प्रवासी मोजण्याचे यंत्रही उपलब्ध असेल, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""सध्याच्या बसगाड्यांचा विचार करून नव्या बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे चालक-वाहकांना फारसा त्रास होणार नाही. शिवाय, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही कमी राहणार आहे. सीएनजीवरील बससाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. सीएनजीवरील एकूण बसपैकी 30 टक्के बस देखभाल-दुरुस्तीमुळे बंद राहतात; तर डिझेलवरील बसचे प्रमाण हे 10 टक्के इतकेच राहणार आहे. 

Web Title: pune news pmp bus Tukaram Mundhe