बस थांब्यावर थाटला संसार; प्रशासनाने कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

शहरातील बहुतांश बस थांब्याचे सुशोभीकरण करण्यात आले.परंतु काही थांब्यांचा गैरवापर होत आहे. यामध्ये सहकारनगरमधील बस थांब्यावर कपडे,शेगडी,चटई व अन्य संसारोपयोगी सामान थाटून संसार उभा केल्याचे चित्र आहे.

सहकारनगर - पुणे शहरातील काही प्रमुख भागांतील बस स्थानकांची दुरवस्था झाली असून, वापराविना ते धूळखात पडले आहेत. काही बस स्थानकांचा गैरवापर होत आहे. सहकारनगर भागातील गोळवलकर पथ या मुख्य मार्गावरील दोन बस स्थानकांवर नागरिकांनी आपला संसार थाटला आहे. 

शहरातील बहुतांश बस थांब्याचे सुशोभीकरण करण्यात आले. परंतु काही थांब्यांचा गैरवापर होत आहे. यामध्ये सहकारनगरमधील बस थांब्यावर कपडे, शेगडी, चटई व अन्य संसारोपयोगी सामान थाटून संसार उभा केल्याचे चित्र आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

प्रवासी किशोर धुमकर म्हणाले, ‘महापालिका प्रशासनाने लाखो रुपये करून प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबा उभा केला आहे मात्र सहकारनगर सारंग बस थांबा येथे संसार थाटला आहे. प्रशासन याबाबत काही कारवाई करणार का? याकडे नगरसेवक व प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे.’

फारुक शेख म्हणाले, ‘लक्ष्मीनगर गजानन महाराज मंदिरासमोरील बस थांब्यावरही एका नागरिकाने अतिक्रमण केले आहे. पदपथावर भाजी विक्री करणाऱ्यावर कारवाई केली जाते मग यावर का केली जात नाही.’

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार

लॉकडाउन काळात बसेस बंद असल्याने बस थांब्यांची दुरवस्था झाली असेल. याबाबत पाहणी करून त्यांची दुरुस्ती केली जाईल. बस स्थानकांवर कोठे अतिक्रमण केले असेल, तर त्याची पाहणी करून कारवाई केली जाईल.
- दत्तात्रेय झेंडे, व्यवस्थापक, पीएमपीएल

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news PMP Busstop in Sahakarnagar