पीएमपीचा पास स्मार्ट फोनवर काढता येणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) नव्याने अपग्रेड करण्यात आलेले पीएमपीचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बस बुक करण्यासाठी आणि पास काढण्यासाठी प्रवाशांनी डेपोत जाण्याची गरज नाही. ही कामे आता आपल्या स्मार्ट फोनवर करता येणार असून, त्यामुळे पीएमपी अधिक प्रवासी केंद्रित झाली आहे.

संकेतस्थळावर जर्नी प्लॅनर, रेग्युलर सर्व्हिस, रात्रसेवा, पुणे दर्शन, विमानतळ सेवा, डॅशबोर्ट आणि सिटीझन कॉर्नर अशी महत्त्वाची फीचर देण्यात आली आहेत.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे म्हणाले, 'इच्छितस्थळी जाण्यासाठी हवी असलेली बस शोधण्याबरोबरच "पुणे दर्शन' बसचे सीट आरक्षित करणे, विमानतळाकडे जाणाऱ्या बसची माहिती घेणे, घरगुती कार्यक्रमासाठी बस बुक करणे, आदी कामे या संकेतस्थळाद्वारे करता येतील. बसच्या रोजच्या फेऱ्यांचे नियोजन, प्रत्यक्षातील फेऱ्या, किती तक्रारी दाखल झाल्या व किती सोडविण्यात आल्या, आदीची माहिती त्यातून दररोज अपडेट केली जाणार आहे. संकेतस्थळाप्रमाणे पीएमपीचे "पीएमपी ई-कनेक्‍ट' हे ऍप्लिकेशनदेखील अपडेट करण्यात आले आहे.''

Web Title: pune news PMP can be passed on a smart phone