पीएमपी वाहक-चालकाकडून प्रवाशाचे पाकीट परत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पुणे - पीएमपी बसमध्ये प्रवाशाचे पैशांसह पडलेले पाकीट परत करत वाहक व चालकाने प्रामाणिकपणा दाखविला आहे.

पीएमपीची बस रावेत बस थांबा येथून शिवाजीनगरकडे येत होती. दरम्यानच्या काळात एका प्रवाशाचे पैशांचे पाकीट बसमध्ये पडले होते. पाकिटामध्ये साडेअठरा हजार रुपये व विविध बॅंकांची कार्ड होती. बस वाहक विजय सुरेश आयरे व चालक फिरोज इस्माईल शेख यांनी पाकिटातील कागदपत्रांतून मोबाईल क्रमांक मिळवत प्रवासी विजय त्रिंबकराज छाजेड (रा. श्रीरामपूर, नगर) यांच्याशी संपर्क साधला. 

छाजेड हे शिवाजीनगरला आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या हस्ते रोख रकमेसह पाकीट त्यांना परत केले. या वेळी छाजेड यांनी वाहक व चालकाचे आभार मानत बक्षीस म्हणून हजार रुपये दिले. शिवाय, पीएमपी कर्मचाऱ्यांमुळे पैशांसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचे सांगितले.

Web Title: pune news pmp driver honesty