‘मी कार्ड’वरून  तू तू - मैं मैं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे - दैनंदिन प्रवासासाठी प्रवाशांना दिलेल्या ‘मी कार्ड’ची तपासणी करण्यासाठी वाहकांकडे दिलेल्या ई-तिकिटिंगच्या रीडरमध्ये इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीची समस्या वारंवार निर्माण होत आहे. यामुळे प्रवाशांना दैनंदिन तिकीट घेण्याचा आग्रह वाहकांकडून होत आहे. परिणामी वाहक आणि प्रवाशांमधील वाद वाढू लागले आहेत. पीएमपी प्रशासनाने मात्र, रीडरची कनेक्‍टिव्हिटी हरवत नसल्याचा दावा केला आहे. 

प्रवाशांना तिकीट देण्याऐवजी प्रवासासाठी ‘मी कार्ड’ (मोबिलिटी इंटिग्रेशन) देण्याचा उपक्रम पीएमपीने गेल्या वर्षी जूनमध्ये स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत सुरू केला. शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील २६ हजार प्रवाशांना ‘मी कार्ड’चे वाटप केले आहे. तसेच, दोन्ही महापालिकांचे कर्मचारी, पोलिस, स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय खेळाडू, अंध, अपंग आणि दिव्यांग आदींनाही ते दिले आहे.  

प्रवाशांना दिलेले ‘मी कार्ड’ वाहकाने त्याच्याकडील ई-तिकिटिंगच्या उपकरणाला टॅग करायचे आहे. त्यात प्रवासाच्या तिकिटाचे पैसे वळते होतात. त्यासाठी इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी ई-तिकिटिंगच्या प्रत्येक उपकरणाला दिली आहे. परंतु, काही वेळा कनेक्‍टिव्हिटी नसल्यास वाहक-प्रवाशांमध्ये वाद होतात.

पुन्हा पैसे कशाला? 
भोसरी- महापालिका मार्गावर ‘मी कार्ड’वरून वाद घडल्याचे तीन प्रसंग दिसून आले. ई-तिकिटिंग रीडरमध्ये इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीची समस्या निर्माण झाल्यास वाहक प्रवाशाला पैसे देऊन तिकीट काढण्यास सांगत आहेत. परंतु, मी कार्ड घेताना रक्कम दिलेली असताना, पुन्हा पैसे कशाला द्यायचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

‘मी कार्ड’ रीड झाल्यास प्रवाशाने काढलेल्या पासची वैधता वाहकाला दिसेल. पासची वैधता संपली असल्यास प्रवाशाने दैनंदिन पास काढावा. बऱ्याच प्रवाशांना ‘मी कार्ड’वरून दैनंदिन पास मिळतो हे माहीत नाही. त्यांना वाहकाने सहकार्य करावे.  
- सुनील गवळी, व्यवस्थापक, पीएमपी

Web Title: pune news PMP Mi card