आर्थिक स्वयंपूर्णतेच्या दिशेने "पीएमपी'ची वाटचाल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

शाश्‍वत विकास प्रक्रियेत वाहतूक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच "पीएमपी'ची जबाबदारी महत्त्वाची आहे. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागांत वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी "पीएमपी'ने नेटके नियोजन केले आहे. त्या अंतर्गतच 12 नवे मार्ग सुरू केले आहेत. 

शाश्‍वत विकास प्रक्रियेत वाहतूक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच "पीएमपी'ची जबाबदारी महत्त्वाची आहे. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागांत वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी "पीएमपी'ने नेटके नियोजन केले आहे. त्या अंतर्गतच 12 नवे मार्ग सुरू केले आहेत. 

रिंगरोडच्या धर्तीवर प्रमुख मार्ग परस्परांना जोडले जात असून, 200 नव्या मिडी बस आल्यावर त्यांच्यासाठीही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 12 आणि 8 नवे मार्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सुमारे 950 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या "पीएमपी'चा तोटा 350 कोटी रुपयांवर पोचला होता. गेल्या काही महिन्यांत सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे हा तोटा भरून काढून किमान संचलनातील तूट तरी पीएमपी भरून काढू शकते. पहिल्या टप्प्यात "ना नफा, ना तोटा' तत्त्वावर पोचून दुसऱ्या टप्प्यात तोटा होणार नाही, या दिशेने पीएमपीचे कामकाज सुरू आहे. याची प्रचिती प्रवाशांना लवकरच येईल. 

या वर्षात 200 नव्या मिडी बस तसेच 800 नव्या बस येतील. तेजस्विनीच्या 25-30 बस अपेक्षित आहेत. बंद बसमधून 100 बस मार्गावर येतील. त्यातून प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा देता येईल अन्‌ उत्पन्नातही वाढ होईल. 

पीएमपीची सेवा एसटी, रेल्वे, विमानतळ आदींशी पूरक असेल, अशा पद्धतीने रचना करण्यात येत आहे. बसचा वापर वाढला की प्रदूषण घटेल आणि अपघात कमी होतील. तसेच नागरिकांच्या वेळेत बचत होऊन शहरातील नागरिकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होईल. वाहतूक व्यवस्थापक, डेपो मॅनेजर, कार्यशाळेतील अधिकारी यांच्या नियुक्‍त्या करताना ते उच्चशिक्षित असतील, यावर लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात पीएमपीचे रूप पलटू शकते. 

या बाबींची पूर्तता करणार... 
- रिंगरोडच्या धर्तीवर प्रमुख मार्ग परस्परांना जोडणार 
- 12 आणि 8 नवे मार्ग सुरू करण्याचे नियोजन 
- तोटा होणार नाही, या दिशेने पीएमपीचे कामकाज 
- 200 नव्या मिडी बस आणि 800 नव्या बस येतील 
- बंद बसमधून 100 बस मार्गावर येतील 

Web Title: pune news pmp Tukaram Mundhe