Pune News: पुण्यात माजी महिला नगरसेविकेने केली PMPL बस चालकाला बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML

Pune News: पुण्यात माजी महिला नगरसेविकेने केली PMPML बस चालकाला बेदम मारहाण

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेविकेने PMPML बस चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत असलेले PMPML चालक शशांक देशमाने यांना डोक्यातून रक्त येई पर्यंत मारहाण केली आहे. पुण्यातील अभिनव चौकात दुपारीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी स्वारगेट डेपोतील PMPML बस चे चालक शशांक देशमाने यांचा मार्ग क्र २ वरती सकाळ पाळीत काम करत असताना अभिनव कॉलेज चौकात बस व कारचा किरकोळ अपघात झाला. त्या अपघातात किरकोळ कारचालक महिला आणि चालक यांच्या मध्ये वाद झाले. यावादातून महिलेने इतर ३ साथीदारांसह चालक देशमाने यांना जबर मारहाण केली.

अपघात झालेल्या चार चाकी गाडीचा चालक आणि कारमधील इतर व्यक्ती हे भाजपचे माजी नगरसेवक असल्याचा असा दावा देशमाने यांनी केला आहे. जखमी चालकाला ससून हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेची पूर्ण माहिती pmpml cmd मा.ओमप्रकाश बकोरिया यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतः पुणे पोलीस कमिशनर यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून दोषींनाविरोधत कडक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यास सांगितला आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.