Sat, June 10, 2023

Viral Video : ड्रायव्हरचं सिनेमाचं वेड अन् प्रवाशांचा जीव टांगणीला; PMPML चालकाचा धक्कादायक पराक्रम
Viral Video : ड्रायव्हरचं सिनेमाचं वेड अन् प्रवाशांचा जीव टांगणीला; PMPML चालकाचा धक्कादायक पराक्रम
Published on : 20 March 2023, 5:57 am
पुण्यात एका पीएमपीएमएल बस चालकाने मोबाईलवर सिनेमा पाहत गाडी चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुण्यात एका पीएमपीएमएल चालक आपल्या मोबाईल फोनवर सिनेमा पाहत गाडी चालवत होता. त्या गाडीमधल्याच एका प्रवाशाने ह व्हिडीओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
या प्रकारानंतर या चालकावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएल चालकाने एका तरुणीसोबत गैरप्रकार केल्याची घटनाही समोर आली होती. त्यानंतर आता ही आणकी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.