पीएमपीएमएलच्या चालक-वाहकामुळे वाचले प्रवाशाचे प्राण !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे: पीएमपीएमएलच्या चालक-वाहकामुळे एका वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचल्याची घटना रविवारी (ता. 17) सकाळी घडली. संजय बबन भेंडवळे (वय 55, रा. आळंदी) असे वृद्ध प्रवाशाचे नाव आहे.

पुणे: पीएमपीएमएलच्या चालक-वाहकामुळे एका वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचल्याची घटना रविवारी (ता. 17) सकाळी घडली. संजय बबन भेंडवळे (वय 55, रा. आळंदी) असे वृद्ध प्रवाशाचे नाव आहे.

पीएमपीएमएलची बस स्वारगेट ते आळंदी या मार्गावर जात होती. रुबीहॉल बस स्टॉपजवळ सकाळी सातच्या दरम्यान भेंडवळे यांना बसमध्ये अचानक त्रास होऊ लागला. त्यांच्या तोंडातून फेस व रक्त येऊ लागले. यावेळी बस चालक विलास शंकर धुमाळ व वाहक सोपान शांताराम कोळी यांनी प्रसांगवाधान दाखवून बस तत्काळ थांबवून पीएमपीएमएलच्या अपघात विभागास याबाबतची माहिती दिली. बसमधील इतर प्रवाशांना दुसऱया बसमध्ये बसवून दिले. संबंधित बसमध्ये भेंडवळे यांना घेऊन ससून रुग्णालयात दाखल केले. दरम्यानच्या काळात त्यांच्या भेंडवळे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

भेंडवळे यांना वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या जीवाचा धोका टळला. भेंडवळे यांच्या नातेवाईकांनी धुमाळ व कोळी यांचे आभार मानले.

ससूनचा असाही अनुभव...
भेंडवळे यांना ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले असता धुमाळ व कोळी यांना रुग्णास स्ट्रेचरवर घेऊन वॉर्डमध्ये दाखल करावे लागले. रुग्णाला स्ट्रेचरवर घेऊन जाण्यासाठी येथे कोणी नसल्याचे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले. धुमाळ यांनी रुग्णाची फी म्हणून दहा रुपये भरल्यानंतर पावती देण्यास नकार देण्यात आला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news pmpml driver-conductor save passenger life