नदीत उडी मारलेल्या मुलाला पोलिसाने वाचवले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - वडिलांना आत्महत्या करण्याची धमकी देत मुलाने पूना हॉस्पिटलसमोरील पुलावरून मुठा नदीत उडी मारली. वडिलांनी लगेच ही बाब पोलिसांना सांगितली. त्यावर बहाद्दर पोलिस कर्मचाऱ्याने पाण्यात उडी मारून त्याला भिडे पुलाजवळ सुखरूप बाहेर काढले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. 

चेतन भीमराव सकट (रा. चिंतामणीनगर, हडपसर) असे त्या मुलाचे नाव आहे. चेतन आणि त्याचे वडील भीमराव सकट (वय 43) हे दोघे जण गुरुवारी सकाळी पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. त्यानंतर ते समोरील यशवंतराव चव्हाण पुलावर बोलत उभे होते. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यावर चेतनने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने काही क्षणातच पुलावरून नदीत उडी मारली. त्यानंतर घाबरलेल्या वडिलांनी आरडाओरडा केला. त्या वेळी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रवींद्र साबळे त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी मारली; परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे चेतन वाहत भिडे पुलाजवळ गेला. त्याला वाचविताना साबळे यांच्या पायाला जखम झाली; परंतु त्यांनी प्रयत्न करून तेथील नागरिकांच्या मदतीने चेतनला पाण्यातून बाहेर काढले. त्या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: pune news police