बलात्कार पीडितेचा पोलिसाला चोप!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

या तरुणीचा "फ्लेक्‍स मशिन'चा व्यवसाय आहे. तीन महिन्यांपूर्वी परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे तिने अर्ज केला आहे. या दरम्यान सहायक फौजदार विलास जाधव यांनी तिच्याबद्दलची गोपनीय माहिती तिच्या व्यवसायाशी संबंधितांना सांगितली. त्यामुळे तिच्याकडील अनेक कामे रद्द झाली. पर्यायाने मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संतप्त तरुणीने शनिवारी सायंकाळी थेट लष्कर भागातील परिमंडळ दोनचे कार्यालय गाठले व जाधव यांना जाब विचारला

पुणे - बलात्कार पीडितेबद्दल तिच्या संबंधित लोकांना माहिती उघड करून तिची बदनामी केली. त्यामुळे व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याने संतप्त तरुणीने पोलिसाला चोप दिला. ही घटना लष्कर भागातील परिमंडळ दोन उपायुक्तांच्या कार्यालयात शनिवारी (ता. 14) सायंकाळी घडली. हा पोलिस कर्मचारीही याच कार्यालयात कार्यरत आहे.

सहायक फौजदार विलास जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीवर "सरकारी कामात अडथळा आणल्याचा' गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ""लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी पीडित तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात मे 2016 मध्ये मुंबईतील तरुणावर गुन्हा दाखल केला होता; मात्र सुरवातीपासूनच कोरेगाव पार्क ठाण्याच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित केला नाही. उलट तरुणाला मदत होईल, अशी भूमिका घेतली. या प्रकरणी पीडित तरुणीने सहपोलिस आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रारी केल्यानंतर पुन्हा उपायुक्तांकडे चौकशीसाठी अर्ज केला आहे.

या तरुणीचा "फ्लेक्‍स मशिन'चा व्यवसाय आहे. तीन महिन्यांपूर्वी परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे तिने अर्ज केला आहे. या दरम्यान सहायक फौजदार विलास जाधव यांनी तिच्याबद्दलची गोपनीय माहिती तिच्या व्यवसायाशी संबंधितांना सांगितली. त्यामुळे तिच्याकडील अनेक कामे रद्द झाली. पर्यायाने मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संतप्त तरुणीने शनिवारी सायंकाळी थेट लष्कर भागातील परिमंडळ दोनचे कार्यालय गाठले व जाधव यांना जाब विचारला.

तरुणीने त्यांना हाताने मारहाण करून नोकरी घालविण्याची धमकी दिली. यामुळे गोंधळ उडाला. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस. के. यादव करत आहेत.

Web Title: pune news: police beating