अडीचशे पोलिसांना फराळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

बिबवेवाडी - सणासुदीच्या काळातही जनतेच्या सुविधांसाठी रस्त्यावर थांबणाऱ्या पोलिसांबद्दल कृतज्ञता  म्हणून मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात सुमारे 250 पोलिसांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. 

या वेळी स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजीराव पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे, पोलिस निरीक्षक विजय देशमुख, मार्केट कमिटीचे अध्यक्ष दिलीप खैरे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, ऍड. गौरी भटेवरा, विजय शिंगवी, गिरीश सोळंकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष अभय संचेती यांनी सांगितले की, पोलिसांना कुठलाही सण आपल्या परिवारासोबत साजरा करता येत नाही. त्यासाठी आम्ही आपल्या देशातील सर्वांत मोठा सण म्हणजे दीपावली पोलिसांसमवेत साजरी करण्याचा निर्णय घेतला. 

डॉ. शिवाजीराव पवार म्हणाले, पोलिसांना संचेती संस्थेने आपल्या सणामध्ये सामावून घेतले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या संस्थेमुळे पोलिसांचे मनोधैर्यदेखील वाढते.

Web Title: pune news police diwali festival