पोलिसांमुळे परत मिळाले चोरीचे दागिने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

पुणे - ‘एक दिवस मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले आणि अर्ध्या तासातच चोरट्यांनी ३८ तोळे सोने पळवून नेले. हे सोने पुन्हा मिळेल, याची शाश्‍वती नव्हती. पोलिसांशी पहिल्यांदाच संपर्क आला आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे माझे सोने मला परत मिळाले,’’ अशा शब्दांत गृहिणी विद्या बोरा यांनी चोरीला गेलेले सोन्याचे दागिने पुन्हा मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. 

विविध गुन्ह्यांत पोलिसांनी हस्तगत केलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम फिर्यादींना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम शिवाजीनगर मुख्यालयात आयोजिला होता. या वेळी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अपर आयुक्त प्रदीप देशपांडे, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त रवींद्र सेनगावकर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त 
पंकज डहाणे उपस्थित होते. 

तानाजी पाटील म्हणाले, ‘‘मी व माझी पत्नी पीएमपी बसमधून प्रवास करत असताना एका चोरट्याने पत्नीच्या हातामधील सोन्याची बांगडी कापण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यास तत्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरट्याने आत्तापर्यंत अनेक चोऱ्या केल्या होत्या.’’

रश्‍मी शुक्‍ला म्हणाल्या...
 शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत १० हजार पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता
 अशा परिस्थितीतही पोलिस शहर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील
 सर्वसामान्य नागरिकांनीही सहकार्य करावे  

Web Title: pune news police jewellery return crime