"तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रमामुळे पोलिसांना प्रेरणा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे - ""गणेशोत्सवात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलिस अहोरात्र मेहनत घेतात. गणेशोत्सवात "सकाळ'च्या वतीने राबविण्यात येणारा "तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम निश्‍चितपणे पोलिसांना प्रेरणा देणारा आहे. पोलिसांच्या कामाचे कौतुक केल्यानंतर त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे,'' असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी केले. 

पोलिस शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी "सकाळ' आणि "रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल'तर्फे "तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात फरासखाना आणि विश्रामबाग येथील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना चिक्की वाटप करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त देविदास पाटील, जयश्री गायकवाड, पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे, पी. एम. पत्की, सहायक निरीक्षक सूरज पाटील तसेच रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयलचे सचिव अजय चौधरी, जयंत रजपूत, उदय कुलकर्णी, गिरीश देशपांडे उपस्थित होते. 

मोराळे म्हणाले, ""गणेशोत्सवातील बंदोबस्त हा पोलिसांसाठी आव्हानात्मक असतो. मात्र, त्याचे एक महिन्यांपासून नियोजन करण्यात आले आहे. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि सुरक्षित पार पडेल.'' अरणकल्ले यांनी प्रास्ताविकात "तंदुरुस्त बंदोबस्त' या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. 

Web Title: pune news police Tandurast Bandobast