ऊस तोडणी मजूरांच्या कोप्यावरती जावून राबविली पोलिओ लसीकरण मोहिम

राजकुमार थोरात
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर पोलिओ मोहिम राबविण्यात आली. पुणे जिल्हामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असून जिल्हाच्या बाहेरुन अनेक ऊस तोडणी मजूरांच्या टोळ्या जिल्हामध्ये आल्या आहेत.

वालचंदनगर : वेळ सायंकाळी साडेपाची... झेडपीचे आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांची गाडी अचानक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यासह बिजवडी  (ता.इंदापूर) जवळील ऊस तोडणी कामगारांच्या कोप्यावरती पोचते...माने यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी मजूरांना पोलिओ डोस दिला का याची विचारणा करुन कोपीवरती लसीकरण मोहिम राबवितात.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर पोलिओ मोहिम राबविण्यात आली. पुणे जिल्हामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असून जिल्हाच्या बाहेरुन अनेक ऊस तोडणी मजूरांच्या टोळ्या जिल्हामध्ये आल्या आहेत. या टोळ्यामध्ये पाच वर्षापर्यंत बालकांचाही समावेश आहे.बालकांसह पहाटेच  ऊसतोडणी मजूर ऊसाच्या फडामध्ये कामासाठी जात असतात. दुपारनंतर लहान मुले व महिला कोपीवरती येतात.

जिल्हातील सर्व बालकांना पोलिआे लस देण्यासाठी आरोग्य समितीचे सभापती प्रयत्नशिल आहेत. आज त्यांनी सायकांळी साडेपाच वाजता ऊस तोडणी मजूराच्या कोपीवरती स्वत: जावून लसीकरण मोहिममध्ये सहभाग घेतला. संदर्भात माने यांनी सांगितले की,फिरत्या मोबाईल टीम च्या माध्यमातुन जिल्हामध्ये गुरुवारपर्यंत (ता.१ फेब्रुवारी) पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.नागरिकांनी आपल्या परीसरातील पाच वर्षापर्यंत बालकांना पोलिस लस मिळाली नसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून लस देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन सभापती माने ,जिल्हा अारोग्य अधिकारी डाॅ.दिलीप माने,व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. दिलीप बोरा यांनी केले.
 

Web Title: Pune news polio in walchandnagar