वाढत्या बांधकामांमुळे प्रदूषणात भर

वाढत्या बांधकामांमुळे प्रदूषणात भर

पुणे - वाढत्या शहरीकरणामुळे महापालिका आणि हद्दीलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. त्यामध्ये वीट, सिमेंट, खडी आणि वाळूमुळे हवाप्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण विभागाने काढला आहे. शहर आणि जिल्ह्यात एका आर्थिक वर्षात सुमारे सव्वालाखाहून जास्त दस्तनोंदणी होते. त्यात ७० टक्के नवीन बांधकामांच्या नोंदणीचा समावेश आहे.

वीट, सिमेंट, खडी आणि वाळूच्या वाहतुकीमुळे हवाप्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे पर्यावरण विभाग, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक निरीक्षण अहवालात नमूद केले आहे. तसेच, जुन्या पाडलेल्या बांधकामांच्या राडारोड्यामुळेदेखील प्रदूषणात भर पडत असते. शहर आणि जिल्ह्यातील बेसुमार वीटभट्ट्या, टेकडीफोड आणि दगडखाणींमध्ये खडी तयार करण्यामुळे वातावरणात धूलिकणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दस्तनोंदणीत गेल्या तीन वर्षांत घट झालेली दिसत असली, तरी बाजारातील मंदी हे त्यामागचे कारण आहे. प्रत्यक्षात बांधकामांची संख्या वाढतच आहे, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले.

गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये दस्तनोंदणीत घट झाली आहे. जमीन, घर आणि सदनिकांच्या खरेदी-विक्रीसह अन्य दस्तनोंदणीदेखील असते. परंतु ७० ते ८० टक्के दस्तनोंदणी बांधकामांची आहेत.
- रामदास भुरकुंडे, उपनिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग

औद्योगिक क्षेत्रात सिमेंट व स्टीलनिर्मिती कारखान्यांतील उत्सर्जनामुळे होणाऱ्या वायू, जल आणि भूमी प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या शहरीकरणात ग्रामीण भागातील बेसुमार बांधकामांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्याचे दूरगामी परिणाम वातावरणासह मानवी जीवनावरदेखील होत आहेत.
- सुहास कुलकर्णी, पर्यावरण विषयातील पदवीधर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com