प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौरांचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे - कचरा, पालापाचोळा, टायर रस्त्यांवर जाळू नये, स्वयंचलित वाहनांचा वापर कमीत कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून नागरिकांनी प्रदूषणावर नियंत्रण आणावे, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे. 

शहरात हिवाळ्याची सुरवात झाली असून, वातावरणात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. या ऋतूमध्ये तयार होणाऱ्या धुक्‍यात धूलीकण व धूर मिसळून हवा प्रदूषित होते. पुणे शहरात दिल्लीच्या तुलनेत प्रदूषण कमी असले, तरी धुके व धूर यांच्या मिश्रणाने तयार होणाऱ्या "स्मॉग'ची पातळी वाढू नये. त्याचे परिणाम मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. कमी अंतरासाठी शक्‍यतो चालत किंवा सायकलचा वापर करावा, मास्कचा वापर करावा, विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाताना व सकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सर्दी खोकला, दम लागणे, असा त्रास झाल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. घर फळबागांत हवा शुद्धीकरण करणाऱ्या तुळस, मुसळी, बांबू, अरेका पाम, कोरफड, मनी प्लांट यासारख्या वनस्पतीची लागवड करावी असेही त्यांनी सांगितले.

Web Title: pune news pollution pune mayor