सावध राहा! गर्भवतींवर होतोय प्रदूषणाचा परिणाम!

योगिराज प्रभुणे
शनिवार, 31 मार्च 2018

बेसुमार वेगाने वाढणाऱ्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. वाढलेला दमा, न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे त्याचे भयंकर दृश्‍य परिणाम आहेत. आता आपल्या पुढच्या पिढीवरही या प्रदूषणामुळे एकप्रकारे ‘विषप्रयोग’ सुरू झाला आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बेसुमार वेगाने वाढणाऱ्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. वाढलेला दमा, न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे त्याचे भयंकर दृश्‍य परिणाम आहेत. आता आपल्या पुढच्या पिढीवरही या प्रदूषणामुळे एकप्रकारे ‘विषप्रयोग’ सुरू झाला आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पुणे - हवेतील सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यातून दमा, ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसिज (सीओपीडी), लहान मुलांमध्ये न्यूमोनिया अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम गर्भवतींवर आणि गर्भावर होतो, असे निरीक्षणही शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

गर्भवतींना प्रदूषणाचा धोका!
नऊ महिने पूर्ण होण्याआधीच सातव्या, आठव्या महिन्यांमध्ये प्रसूती होणे
मृतावस्थेत मूल जन्माला येणे
शरीराला प्राणवायू कमी पडणे
पाय सुजणे

गर्भावर होणारा दुष्परिणाम
वाढ खुंटणे
मज्जासंस्थेच्या विकास कमी होणे
प्राणवायू कमी प्रमाणात मिळणे

फुफ्फुसांची कार्यक्षमता घटतेय!
शरीरासाठी आवश्‍यक असलेली १० टक्के ऊर्जा अन्न व पाण्यातून मिळते. उर्वरित ९० टक्के ऊर्जा श्‍वसनावाटे शरीरात जाणाऱ्या प्राणवायूतून मिळते. आपले फुफ्फुस रोज एक हजार लिटर ऑक्‍सिजन शोषून घेते. पण हवेतील दूषित घटकांमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. इतर देशांतील नागरिकांच्या तुलनेत भारतीय नागरिकांचे फुफ्फुस ३० ते ३५ टक्‍क्‍यांनी दुर्बल असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे.

प्रदूषणामुळे गर्भवतींना श्‍वास घ्यायला त्रास होतो. त्यात गर्भवतीला दमा असल्यास त्यातील गुंतागुंत वाढते. शरीराला योग्य प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत नाही. त्याचा थेट परिणाम गर्भाच्या वाढीवर होतो. गर्भाची वाढ खुंटते.
- डॉ. संजय गुप्ते, स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष

Web Title: pune news pregnant women effect by pollution