पुण्यातील ५ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बारा अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पुणे शहर पोलिस आयुक्‍तालयात कार्यरत पाच अधिकारी, तर महाराष्ट्र राज्य कारागृह विभागातील सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बारा अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पुणे शहर पोलिस आयुक्‍तालयात कार्यरत पाच अधिकारी, तर महाराष्ट्र राज्य कारागृह विभागातील सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पुणे शहर पोलिस आयुक्‍तालय :
भीम वामन छापछडे, (पोलिस निरीक्षक, बिनतारी संदेश विभाग, पुणे), सुधीर प्रभाकर अस्पत (पोलिस निरीक्षक, राज्य महामार्ग, पुणे), विक्रम निवृत्ती काळे (सहायक फौजदार, बिनतारी संदेश विभाग, पुणे), जयसिंगराव खाशाबा संकपाळ (सहायक फौजदार, शिवाजीनगर मुख्यालय, पुणे) आणि सोमनाथ रामचंद्र पवार (सहायक फौजदार, वाहतूक शाखा, पुणे) यांना राष्ट्रपती पोलिसपदक जाहीर झाले आहे.

छापछडे यांना पोलिस दलातील आत्तापर्यंतच्या सेवा कालावधीत उत्कृष्ट सेवेबद्दल १०९ बक्षिसे मिळाली आहेत. अस्पत यांना उत्कृष्ट सेवेबद्दल २४५ बक्षिसे मिळाली असून, सन २००३ मध्ये पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. काळे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल ३२५ बक्षिसे मिळाली असून, सन २०१० मध्ये पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहे. संकपाळ यांना सेवाकालावधीत उत्कृष्ट सेवेबद्दल २०७ बक्षिसे मिळाली आहेत, तर पवार यांना उत्कृष्ट सेवेबद्दल १५५ बक्षिसे प्राप्त झाली आहेत.

महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग :
सुनील निवृत्ती ढमाळ (उपअधीक्षक, अतिरिक्‍त पोलिस महासंचालक कार्यालय, पुणे), धर्मराज नामदेवराव नघाटे (सुभेदार, नागपूर मध्यवर्ती कारागृह), आनंदा शंकर हिरवे (सुभेदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), जगन्नाथ पांडुरंग खुपसे (हवालदार, जालना जिल्हा कारागृह), संजीव सखाराम घाणेकर (हवालदार, कोल्हापूर जिल्हा कारागृह), गजानन दिगंबर क्षीरसागर (हवालदार, अमरावती मध्यवर्ती कारागृह) आणि सुभाष तोताराम तायडे (रक्षक, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह).

Web Title: pune news President Police Medal Republic Day